धक्कादायक! स्पर्धा जिंकण्यासाठी तरूणाने केला जीवघेणा प्रयत्न, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | सगळ्या क्षेत्रामध्ये माणसाना प्रगती केली आहे. आता सगळं आधुनिक झालं असून, ज्या कामांना याआधी खूप दिवस लागायचे आता तिच काम काही मिनीटांत होताना आपण पाहत आहोत.

परंतू यासगळ्यामध्ये माणसाला स्वत:साठी वेळ काढता येत नाहीय. तसेच सगळीकडे जिंकण्याची चढाओढ सुरू आहे. प्रत्येकाला कोणत्याना-कोणत्या रेसमध्ये जिंकायचंच असल्याचं आपल्याला दिसतं आहे.

तुम्ही कुठेही गेला, एवढंच नाही तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला तरी त्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा नसेल असं दिसणारच नाही. स्पर्धा जिंकण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. मात्र काहीजण आपल्या जीवाची पर्वा न करता, ती स्पर्धाच संपूर्ण जीवन असल्यासारख वागतात.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्पर्धा जिंकण्यासाठी चक्क आपल्या डोळ्यांच्या मदतीने एक नाही दोन नाही तब्बल 36 किलो वजन उचलत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

आपण आपल्या हातांनी 25 किलोचा धान्याचं पोत उचलायचं झालं तर काहींना तेही खूप असल्यासारखं वाटतं. परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तर डोळ्यांनी वजन उचताना दिसतं आहे.

एक व्यक्ती आपल्या दोन्ही डोळ्यांच्या खालच्या भागात एक-एक कडी अडकवतो. त्यानंतर त्याला वेदना होत असतानाही, तो उभा राहतो आणि ठेवलेलं वजन आपल्या डोळ्यांच्या सहाय्यानं उचलून दाखवतो. हा सगळा प्रकार एका रियालिटी शोदरम्यान सुरू असल्याचं समजतं आहे.

हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला असल्याचंही बोललं जात आहे.

https://www.instagram.com/p/CUWs1oMFhK6/

महत्वाच्या बातम्या-

स्केटींग करता करता तरूण-तरूणीने केला भन्नात डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

कौतुकास्पद! सायकल चालवताना तरूणाने केला अनोखा स्टंट, पाहा व्हिडीओ

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहा आणि परिचे ‘हे’ फोटो होतायत तूफान व्हायरल, पाहा फोटो

काय सांगता! चक्क जंगलाचा राजा सिंह ‘या’ प्राण्याला पाहून गेला पळून, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क पुरूष करतोय बिकनी घालून पोल डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ