विंडीजच्या ‘या’ गोलंदाजाची पहिल्या कसोटीतून माघार

मुंबई :  भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीला काही तासाचा अवधी शिल्लक असताना यजमान संघाला धक्का बसला आहे. टी-20 मालिकेत शिखर धवन, कृणाल पांड्या, मनिष पांडे या भारताच्या प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवणारा अष्टपैलू किमो पॉल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघात वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने मिग्युएल कमिन्सला स्थान दिलं आहे. 

‘भारत-अ’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यात कमिन्सने चांगली कामगिरी केली होती, अशी माहिती वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फ्लोयड रेइफर यांनी दिली.

28 वर्षीय कमिन्सने तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्या मालिकेत त्याने दुसऱ्या सामन्यात 102 धावा देत 9 विकेट्स घेतल्या होत्या. 6 बाद 48 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

भारत-विंडिज ही 2 कसोटी सामन्यांची मालिका असून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यासाठी दोनही संघ दमदार तयारी करत आहेत. 

भारत-विंडिज पहिला सामना 22 ते 26 ऑगस्ट तर दुसरा सामना 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

ही स्पर्धा विविध टप्प्यात चालणार असून 2 वर्षांनी या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचा स्तर उंचावेल, असं मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-बाळासाहेबांचे विचार अजूनही जिवंत आहेत- सुप्रिया सुळे

“राजकारण बाजूला, कुटुंब म्हणून आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी”

-औरंगाबादमध्ये काँग्रेसला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी!

-राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयाकडे रवाना

-गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचं बाळा नांदगावकरांना आवाहन