काय सांगता! चक्क 95 वर्षांची आजी चालवतीय चारचाकी गाडी, पाहा व्हिडीओ

भोपाळ | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ खरंच खूप प्रेरणा देणारे असतात.

अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्याला माहित आहे की, आजकाल कोणत्याच क्षेत्रात महिला मागे नाहीत. सर्वच कामांमध्ये महिला पुरूषांच्या बरोबरीनं काम करताना आपण पाहत आहोत.

तसेच आपल्याला हेही माहित आहे की, महिला दोनचाकी गाडीतर चालवतात. आता त्या चारचाकीही चालवू लागल्या आहेत. परंतू या आधी तुम्ही कधी एका वृद्ध आजीला चारचाकी गाडी चालवताना पाहिलं आहे का?

नसेल पाहिलं तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. या व्हिडीओमध्ये एक वयस्कर आजी चक्क हायवेवर खूप जोरात चारचाकी चालवत असल्याचं दिसून येतं आहे. आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

गाडी चालवणारी महिला मध्य प्रदेशच्या देवासमधील राहणारी आहे. त्यांचं नाव रेशम बाई तन्वर असून त्या 95 वर्षाच्या असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यांचा हा गाडी चालवतानाचा व्हिडीओ ‘अनुराग’ नावाच्या एका ट्विटर यूजरने आपल्या आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ लोकांनी पाहिला असून, अनेकांनी आजींचं कौतुकही केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! चक्क लस घेताना 20 वर्षाचा तरूण लहान मुलांसारखा रडतोय, पाहा मजेशीर व्हिडीओ

कौतुकास्पद! माणसाने तहानलेल्या कुत्र्याची ‘या’ प्रकारे भागवली तहान, पाहा व्हिडीओ

तरूणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘आनंद पोटात माझ्या मावेना’ म्हणत भर मंडपातच नवरी झाली सुरू, पाहा व्हिडीओ

काय सांगता! साडी घातली म्हणून महिलेचा हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, पाहा व्हायरल व्हिडीओ