Top news देश

काय सांगता! चक्क एका हत्तीने पाण्यात जाऊन मगरीवर केला हल्ला, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Youtube/ Latest Sightings

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, काही लोकांना प्राण्यांविषयी जाणून घ्यायला खूप आवडते. तर दुसरीकडे अशी लोक आहेत की त्यांच्यासमोर एखाद्या प्रण्याचं नाव जरी काढलं तरी त्यांना अंगावर काटा येतो.

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात.

त्यामध्ये कधी प्राण्यांची हाणामारी असते, तर कधी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतो. तर अशातच सोशल मीडियावर याच संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्याला माहित आहे की, हत्ती हा एक शांत प्राणी म्हणून ओळखला जातो.

परंतू तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत तो शांत, मात्र एकदा तो चिडला तर तो कोणालाच आवरत नाही. त्याचप्रमाणे मगर ही पाण्यात असते. ज्याप्रमाणे हत्तीला जंगलातील प्राणी घाबरतात,अगदी तसच मगर पाण्यातील प्राण्यांमधील मुख्य आहे असं आपण म्हणू शकतो.

याआधी तुम्ही कधी एका हत्ती आणि मगरीची हाणामारी पाहिली आहे का?. नसेल पाहिली तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. या व्हिडीओमध्ये चक्क एक हत्ती एका मगरीला आपल्या सोंडेने मारत असल्याचं दिसून येतं आहे.

एका पाण्याच्या तळ्यामध्ये एक हत्ती उभा राहिला आहे. त्या पाण्यामध्ये एक मगर देखील आहे. तो हत्ती त्या मगरीला आपल्या लांब सोंडेने पाण्यात पालथी-उलथी करत आहे. हत्तीसमोर ती एवढीशी मगर हतबल झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“2014 च्या निवडणुकीत थापा मारून सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला”

आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर…- धनंजय मुंडे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; महानगरपालिकेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

“माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांना मस्ती आली आहे, त्यांचे कुठं हनिमून सुरू आहे?”

“मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली”