चित्रपटातील एका भूमिकेसाठी कंगनाला काय काय करावंं लागतंय…..

मुंबई| कंगना राणावत नेहमी वादाच्या भोव्यात असलेली दिसते. वादग्रस्त वक्व्यामुळे ती नेहमी चर्चेत असलेली पहायला मिळते. सध्या ती आगामी चित्रपट ‘तेजस’च्या चित्रीकरणासाठी तयारी करत असल्याचं समजंतय. तिने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिची या चित्रपटातल्या भूमिकेसाठीची मेहनत दिसत आहे.

कंगनाने तिच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याविषयी कंगनानं सांगितलं की, तिच्या या भूमिकेसाठी ती खूप कठोर आर्मी ट्रेनिंग घेत आहे. मुंबईमधल्या एका स्टुडिओमध्ये हे ट्रेनिंग सुरु आहे.

व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली की, फक्त वर्दी घालणं एवढंच पुरेसं नाही, तर त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं, त्यांचा स्ट्रगल हे सगळं अनुभवणं गरजेचं आहे. हे लक्षात यायला हवं की कणखर शरीर बनायला काय लागतं. ती हेही म्हणाली की, ती वर्दी घालण्याच्या योग्यतेचं ते शरीर बनायला हवं.

कंगना सोशल मीडियावर बरीच सक्रीय असलेली पहायला मिळते. ती कायम आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून या चित्रपटाबद्दल पोस्ट्रर शेअर करत असते. तिने नुकतंच या चित्रपटाचा दिग्दर्शक सर्वेश मेवारा याच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं आहे.

सर्वेश मेवारा यांच्याविषयी बोलताना कंगना म्हणाली, “या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सर्वेश मेवारा यांना आपला पहिला चित्रपट मिळवण्यासाठी एका दशकाहून अधिक काळ स्ट्रगल करावा लागला आहे. काल या चित्रपटाच्या शुटिंगच्या पहिल्या दिवशी त्याची आई भावूक झाली. ते पाहून मला माझ्या परिवाराची आठवण झाली. बाहेरच्या लोकांना या क्षेत्रात येणं फार अवघड असतं. सर्वेशला सॅल्युट.”

दरम्यान, कंगना तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटामध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकाची भूमिका साकारत आहे. ‘तेजस’ आणि ‘धाकड’पूर्वी कंगना ‘थलायवी’ चित्रपटात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट मार्च महिन्यापासून तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी तिने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल खुलासा केला आहे. या चित्रपटात ती शिख वायुसेना अधिकारी तेजस गिलच्या भूमिकेत झळकणार आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण रखडले होते. कलाकारदेखील कोरोनाच्या भीतीने चित्रीकरण टाळत होते. मात्र, आता अनलॉक सुरू झाल्यांनतर परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत असून अनेक कलाकारांनी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या –

दररोज एक कप ‘ग्रीन टी’ पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरंच होणार घट? अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या…

“अनुराग आणि तापसी हे फक्त टॅक्स चोर नाहीत तर दहश.तवादी देखील आहेत” – कंगणा राणावत

राखीने शेअर केला बाथरुममधील ‘तो’ व्हिडिओ, पाहाल तर तुम्ही देखील हसून लोटपोट व्हाल

…म्हणून उद्धव ठाकरेंनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाही; अखेर कारण आलं समोर