“उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात संबंध काय?”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या (Sridhar Patankar) मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. तब्बल 6 कोटी 45 लाख रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्याचबरोबर काही गंभीर आरोप देखील ठेवण्यात आले आहेत.

ईडीच्या या कारवाईनंतर आता भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत घणाघाती टीका केली आहे.

श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीला पाठपुरावा करत आहे. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारामुळे त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ईडीला गेल्या दीड वर्षात कोट्यवधींची माहिती दिली आहे. सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे, असंही किरीट सोमय्यांनी यावेळी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे संबंध काय?, असा सवाल देखील सोमय्यांनी यावेळी उपस्थित केलाय. पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यातील आर्थिक संबंध व्यवहारावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत का?, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारलाय.

आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी 2014 मध्ये कोमास प्रॉपर्टीज कंपनी जी बनवली होती. आदित्य ठाकरे मालक पण, संचालक पण होते. 50 टक्के त्यांचे आणि 50 टक्के रश्मी ठाकरेंचे होते, असा आरोप देखील सोमम्यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या – 

Russia Ukraine War: नको तेच झालं! रशियाकडून युक्रेनवर ‘फॉस्फरस बॉम्ब’चा वापर, आता…

“मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचेsss पाहुणे”, व्हिडीओ शेअर करत मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

Mahua Moitra: “अटलजींची भीती आज खरी ठरली”, महुआ मोइत्रा लोकसभेत कडाडल्या

Deltacron: काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रूग्ण सापडले

 “भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने…”, The Kashmir Files वर बोलताना फडणवीसांची बोचरी टीका