साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन जेव्हा मराठीत बोलतो…, पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘सुपरस्टार’ अल्लु अर्जुन याचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. आंध्र प्रदेशमधल्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

अल्लू अर्जुनची धडाकेबाज शैली तर, रश्मिकाच्या सौंदर्याने प्रेक्षक घायाळ झाले आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमा दरम्यान अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधल्याने त्याचे देखील कौतुक होतंय.

या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर, पुष्पा राज हा एक दुष्ट लाल चंदन तस्कर आहे, जो या दुष्ट चक्रामध्ये वेगाने वाढतो आहे. यादरम्यान त्याला पोलिस खात्याशीही सामना करावा लागतो.

तिरुपतीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवला गेला आहे. या चित्रपटात रश्मिकाने अल्लू अर्जुनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.

अशाच एका प्रमोशन सोहळ्यादरम्यान अल्लूने चक्क मराठी ‘सगळ्यांना माझा नमस्कार…’ असं म्हणत चाहत्यांशी संवाद साधला आहे. सध्या अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

चित्रपट पूर्ण त्याच्या अ‍ॅक्शनने भरलेला आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटाप्रमाणेच अॅक्शन सिक्वेन्सही धमाकेदार आहेत. अल्लू आणि रश्मिकाची प्रेमकहाणी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करते.

महत्त्वाच्या बातम्या- 

“ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं” 

पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई, बड्या भाजप नेत्याला अटक झाल्याने खळबळ 

“संप मागे घेतला नाहीतर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार” 

कोरोनामुक्त पुरुषांसाठी जास्त घातक ठरतोय Omicron?; संशोधनातून हैराण करणारी बातमी समोर 

“पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही”