‘बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?’; उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची प्रखर भूमिका मांडल्यानंतर आता राज्यातील राजकारणाला एक वेगळं वळण लागलं आहे. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना प्रवक्तांची बैठक आज पार पडली. या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.

बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरू होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

भाजपवर तुटुन पडा, सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या. यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवून द्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकीकडे मनसे आणि भाजप आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठा वाद रंगण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर अजितदादा गडकरींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

काळजी घ्या! पुढील 4 दिवस महत्त्वाचे; राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास खलबतं

…अन् अखेर वारकरी संप्रदायाच्या आक्रमकतेसमोर पोलीस अधिकारी नमला!

 “…तर मी कॅमेऱ्यासमोर पूर्णपणे टॉपलेस होईन”, अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य