MPSC परीक्षेचा निकाल जाहीर; सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 2020चा अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.

यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले याने प्रथम क्रमांक तर नितेश कदम याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर रुपाली माने हिने महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

मुलाखती संपल्यानंतर अवघ्या दोन तासात राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व परीक्षार्थी आश्चर्यचकित आहेत. आयोगाने 597 उमेदवारांची गुणवत्ता यादी घोषित केली.

राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांना निकाल तपासता येणार आहे. एप्रिल 2020 मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होतं. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा चार वेळा पुढे ढकलावी लागली होती.

दरम्यान, झटपट निकाल लागल्याने आता विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर अपयश मिळालेल्या उमेदवारांसाठी पुढील लढण्यासाठी वेळ मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?’; उद्धव ठाकरेंचा सवाल

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर अजितदादा गडकरींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

काळजी घ्या! पुढील 4 दिवस महत्त्वाचे; राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास खलबतं

…अन् अखेर वारकरी संप्रदायाच्या आक्रमकतेसमोर पोलीस अधिकारी नमला!