स्टंट करायला गेला पण चांगलाच अंगलट आला, चालू बाईकवर उभं राहताच दणकण आदळला; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काहीवेळा सोशल मीडियावरील हे व्हिडीओज आपलं मनोरंजन करतात तर काहीवेळा आपल्याला एक चांगली शिकवून देऊन जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंटचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

स्टंट करून सोशल मीडियावर फॅन फॉलोवींग वाढवण्याचं एक नवीनंच फ्याड आजच्या तरुणाईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पण या स्टंट्समुळे आजवर कित्येकांना आपले प्रा.ण देखील गमवावे लागले आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक मुलगा असाच स्टंट करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा रस्त्यावर बाईक चालवत आहे. बाईक चालवताना अचानक तो चालू बाईकवर उभा राहतो.

काही वेळाने तो हात सोडून उभं राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दुर्दैवाने त्याचा तोल जातो आणि तो दणकण खाली आदळतो. यावेळी त्या मुलाची बाईक एका साईडला जाऊन पडते आणि तो मुलगा दुसऱ्या साईडला जाऊन पडतो.

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे या मुलाच्या डोक्याला चांगलीच दुखापत झाली असावी. तसेच त्याच्या पाठीला देखील मा.र लागल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे.

नेटकरी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही युजर्स यावर प्रतिक्रिया देत हे मृ.त्यूला आमंत्रण असल्याचं बोलत आहेत. आत्तापर्यंत 14 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकरी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ प्रथम ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटरवर या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं आहे की, तुम्ही कधी मित्र किंवा लहान मुलांसह असा प्रकार होताना पाहिला आहे का? नसेल पाहिला तर असा मुर्खपणा करण्यापासून त्यांना थांबवा. सुरक्षितेला प्राथमिकता द्यायला हवी. नियमांचे पालन करायला हवे.

महत्वाच्या बातम्या –

एसबीआयची ग्राहकांना जबरदस्त भेट! आता अगदी कमी व्याजदरात मिळणार ‘ही’ 5 कर्ज; जाणून घ्या

ऐकावं ते नवलंच! दोन महिन्यांच्या चिमुरड्यासाठी गुजरातच्या पठ्ठ्याने चंद्रावर जमीन घेतली; जाणून घ्या किंमत

‘…म्हणून देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले’; संजय राऊतांचा रोखठोक मधून गृहमंत्र्यांवर ह.ल्लाबोल

संतापाचा कडेलोट! ‘या’ भाजप आमदाराचे कपडे फाडत शेतकऱ्यांनी चढवला ह.ल्ला; व्हिडीओ व्हायरल

पतीला घटस्फोट देऊन ‘ही’ अभिनेत्री राहतेय बाॅबी देओलच्या घरात