एसबीआयची ग्राहकांना जबरदस्त भेट! आता अगदी कमी व्याजदरात मिळणार ‘ही’ 5 कर्ज; जाणून घ्या

नवी दिल्ली | स्टेट बँक ऑफ इंडिया सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येत असते. ही बँक सदैव आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असते. अशातच आता सणासुदीच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स घेऊन आली आहे.

एसबीआय बँकेकडून 5 वेगवेगळ्या प्रकारची कर्ज आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या कर्जाचा व्याजदर देखील अगदी कमी आहे. नुकतंच बँकेने यासंबंधीत ट्विट करत माहिती दिली आहे.

बँकेने ट्विट करत असं लिहिलं आहे की, एसबीआय तुमच्या कर्जाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आहे. जेणेकरून तुम्ही आयुष्यातील प्रत्येक टप्प्याचा आनंद घेऊ शकता. तसेच बँकेने या ट्विटमध्ये पूढे एक लिंक देखील शेअर केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया पूढील पाच वेगवेगळ्या प्रकारची कर्ज आपल्या ग्राहकांना देत आहे.

गृहकर्ज
एसबीआय आपल्या ग्राहकांना अगदी कमी व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे. एसबीआय केवळ 6.70 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. तसेच सीबीएल स्कोरच्या आधारे यात बदल होऊ शकतो.

वाहन कर्ज
एसबीआय आपल्या ग्राहकांना 85 महिन्यांसाठी वाहन कर्ज उपलब्ध करून देत आहे. वाहन कर्ज 7.50 टक्क्यांनी दिले जाणार आहे.

ओव्हरसीज एज्युकेशन लोन
एसबीआय बँक तुम्हाला परदेशात शिक्षण घेण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध करून देत आहे. याचा व्याजदर 9.30 टक्के असेल.

प्री अॅप्रुव्हड पर्सनल लोन
प्री अॅप्रुव्हड पर्सनल लोनसाठी तुम्हाला केवळ 9.60 टक्के व्याजदर ठेवण्यात आलेला आहे. इतर बँकांच्या तुलनेत हा व्याजदर खूप कमी आहे.

गोल्ड लोन
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना गोल्ड लोनची सुविधा देखील देत आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे देखील अगदी थोडी आहेत. हे गोल्ड लोन तुम्हाला 7.50 टक्क्यांनी उपलब्ध होईल.

महत्वाच्या बातम्या –

ऐकावं ते नवलंच! दोन महिन्यांच्या चिमुरड्यासाठी गुजरातच्या पठ्ठ्याने चंद्रावर जमीन घेतली; जाणून घ्या किंमत

‘…म्हणून देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले’; संजय राऊतांचा रोखठोक मधून गृहमंत्र्यांवर ह.ल्लाबोल

संतापाचा कडेलोट! ‘या’ भाजप आमदाराचे कपडे फाडत शेतकऱ्यांनी चढवला ह.ल्ला; व्हिडीओ व्हायरल

पतीला घटस्फोट देऊन ‘ही’ अभिनेत्री राहतेय बाॅबी देओलच्या घरात

‘फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत,…