फोनवर बोलता-बोलता नर्सने दिली महिलेला दोनदा कोरोना लस, त्यानंतर जे घडलं ते वाचून तुम्हालाही बसेल ध.क्का

नवी दिल्ली |  गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. काही दिवसांपूर्वी ही परिस्थिती आटोक्यात आली असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे.

त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. तरीही देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी सरकारने लसीकरणाला सुरूवात केली आहे.

संपूर्ण देशभरात ही कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. परंतू अशातच लसरणासंदर्भात कानपूर देहातमधून एक ध.क्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

कानपूक देहातच्या मडौली पीएचसीमध्ये कोरोनाची लस दिली जात आहे. यादरम्यान फोनवर व्यस्त असलेल्या एएनएमनं एका महिलेला दोनदा कोरोना लस दिली. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर लस घेतलेल्या महिलेनं त्या नर्सविरोधात तक्रार नोंदवली.

लस घेतलेल्या महिलेचं नाव कमलेश देवी असून, तिने घडलेला सर्व घटना क्रम सांगितला. कमलेश देवी कोरोना लस घेण्यासाठी पीएचसीमध्ये गेली असता, त्यावेळी तेथील नर्स कोणासोबतरी फोनवर बोलत होती. फोनवर बोलता-बोलताच तिनं मला कोरोनाची लस दिली. लस दिल्यानंतर मी तिथेच बसून राहिले आणि त्या नर्सने देखील मला उठण्यास सांगितले नाही. फोनवर बोलता-बोलता ती हे विसरली की तिनं मला लस दिली आहे आणि तिनं मला पुन्हा एकदा कोरोना लस दिली.

यानंतर कमलेश देवी यांनी त्या नर्सला विचारले की, कोरोना लस दोनदा दिली जाते का? त्यावर ती नर्स म्हणाली की, नाही एकदाच दिली जाते. कमलेश देवींनी सांगितलं की, तुम्ही मला दोनदा लस दिली. त्यावर ती नर्स त्या महिलेच्या अंगावर धावली आणि म्हणाली की, तू एकदा लस घेतली होतीतर, तू इथुन उठून का गेली नाहीस?, असा प्रश्न त्या महिलेला करू लागली. त्यावर त्या महिलेनं उत्तर  दिलं तुम्ही मला जाण्यास सांगितलं नाही. मला माहिती नव्हत कोरोना लस एकदा घ्यायची असती की दोनदा. त्यानंतर त्या नर्सने आपला चूक झाली असल्याचंही मान्य केलं.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अधिकाळी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन देत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

तसेच डीएम साहेबांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती कानपूर देहातचे सीएमओ राजेश कुमार यांनी फोनवरून दिली.

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता गरिबांच्या पोटापाण्याची काळजी…

कलिंगड घेताना चुकूनही करु नका ‘ही’ चूक, नाहीतर खाल्ल्यावर…

कोरोनाची लस घेतल्यानंतर चुकूनही करु नका ‘या’ 5…

जाणून घ्या! चेहऱ्यावरील डाग घालवण्याचे ‘हे’…

राखी सावंत पुन्हा एकदा चढणार बोहऱ्यावर; ‘या’…