मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता गरिबांच्या पोटापाण्याची काळजी मिटणार!

नवी दिल्ली| आगामी काळात खाणक्षेत्रात आमुलाग्र बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नुकतच मोदी सरकारने मंजुर केलेल्या खाण व खनिज कायद्यात सुधारणा करणारे विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजुर झाले. या कायद्यामुळे खाणींच्या उत्पादनाला वेग मिळेल आणि नोकऱ्याही तयार होतील, अशी माहिती केंद्रीय खाण आणि खनिज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. तसेच यामुळे आता मंजूरीसाठी प्रलंबित अनेक खाणी सुरु होण्यातील अडथळा दूर झाल्याचंही त्यांनी नमूद केलं

गेल्याच महिन्यात संसदेत या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. या विधेयकामुळे देशातील खनिकर्म क्षेत्रात नव्या सुधारणांना चालना मिळेल. यामुळे खनिज उत्पादन वाढण्याबरोबर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मितीही होणार आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, या विधेयकाच्या मंजुरीमुळे खनिकर्म क्षेत्रात देशभरात तब्बल 55 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोरोना संकटामुळे देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले असताना ही बाब आशादायक मानली जात आहे. तसेच उत्पादन वाढल्यामुळे सरकारच्या महसुलातही मोठी भर पडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

या कायद्यामुळे केंद्र सरकारचे खाणींच्या लिलाव करण्याचे अधिकार वाढले आहेत. “राज्य सरकार ज्या ठिकाणी खाणींचे लिलाव करु शकणार नाही त्या ठिकाणी केंद्र सरकार खाणींच्या लिलावाची प्रक्रिया पार पाडेल. तसेच या खाणींचं उत्पन्न राज्य सरकारांनाच देण्यात येईल,” असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलंय.

खाणीशी संबंधीत प्रकल्पाची गरज पूर्ण झाल्यानंतर खाणीतील 50 टक्क्यांपर्यंतची खनिजं खुल्या बाजारात विकण्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, नव्या नियमांमुळे ही खनिजांची आयात कमी होऊ शकते. तसेच या माध्यमातून सरकारला मिळालेल्या महसूलाचा वापर संबंधित राज्यांच्या विकासासाठी केला जाईल, असे आश्वासनही प्रल्हाद जोशी यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या – 

कलिंगड घेताना चुकूनही करु नका ‘ही’ चूक, नाहीतर खाल्ल्यावर…

कोरोनाची लस घेतल्यानंतर चुकूनही करु नका ‘या’ 5…

जाणून घ्या! चेहऱ्यावरील डाग घालवण्याचे ‘हे’…

राखी सावंत पुन्हा एकदा चढणार बोहऱ्यावर; ‘या’…

भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, अभिनेत्री…