मतदान करणाऱ्यांना सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार- देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होईल. विधानसभा निवडणुकांच्या  तारखांची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवाची घोषणा महाराष्ट्रामध्ये केली आहे. मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो आणि या घोषणेचे स्वागत देखील करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांनी प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करावा. सध्या महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या या सूचनेचे सर्वच राजकीय पक्ष तंतोतंत पालन करतील, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी  केली आहे.

लोकशाहीचा महोत्सव खुल्या आणि चांगल्या वातवारणात पार पाडू असा माझा विश्वास आहे. माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-