लसीकरणाविषयी WHO नं दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून डोकं वर काढलेलं आहे. या काळात अनेकांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, आपल्या कुटुंबाला गमवावं लागलं, या महामारीमुळे तर मृत्यूचा तांडवच पहायला मिळाला.

कोरोनानं सगळं जग संसर्गजन्य झालं असताना कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणावर भर दिला गेला. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं शस्त्र आणि एकमेव शस्त्र असल्याचं पहायला मिळालं.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबवल्या जात आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या लसीकरणाचा परिणामही जाणवत आहे. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सोमवारी लसीकरणाविषयी बोलताना म्हटलं की, ज्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे त्या लोकांमध्ये लसीकरणाचा परिणाम चांगला दिसून आला आहे.

पुढे स्वामीनाथन यांनी म्हटलं की, पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढत आहे. मात्र लसीकरणामुळे मृतांची संख्या कमी झाली आहे.

लसीकरणासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी आणि अनेक नागरिकांपर्यंत लसीकरण पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहे. नागरिकांना मोफत ऑफर दिल्या जात आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणू अधिक घातक आहे. त्यामुळे खबरदारी घेणं गरजेचे आहे. कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  …म्हणून दिल्ली सरकार लवकरच लाॅकडाऊन करण्याच्या तयारीत?

  अशोक चव्हाण आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

 भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार का?; सौरव गांगुली म्हणतो…

 ‘दंगलीचा कट भाजपच्या ‘या’ नेत्याने रचला’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राज्यात मुसळधार पावसाचं सावट! ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी