…म्हणून दिल्ली सरकार लवकरच लाॅकडाऊन करण्याच्या तयारीत?

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं सगळीकडे हाहाकार माजवला आहे. कोरोनाचं सावट असतानाच आता वायू प्रदूषणाची चिंताही सतावत आहे.

वाढत्या वायू प्रदूषणामुळे राजधानीत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्लीत चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढतं प्रदूषण पाहता आता सरकार लाॅकडाऊन लावण्यासाठीची पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

दिल्लीतील वायू प्रदूषणाचा धोका लक्षात घेता आम आदमी पार्टी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी पूर्ण लॉकडाऊनसारखे पाऊल उचलण्यास आम्ही तयार आहोत, असं आम आदमी पार्टीनं न्यायालयाला सांगितलं आहे.

सोमवारी दिल्ली सरकारनं लॉकडाऊन करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. एनसीआरमध्ये लॉकडाऊन केल्यास दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती केजरीवाल सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

प्रदूषणाचा धोका लक्षात घेता, दिल्ली सरकारनं 26 पानी प्रतिज्ञापत्रात प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती देण्यात आली आहे.

देशभरात दिल्लीमध्ये प्रदूषणाचा धोका जास्त आहे. या वाढत्या प्रदूषणावर ठोस पावलं उचलावीत म्हणून सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला फटकारलं आहे.

वाढत असलेल्या गाड्या, वीज निर्मितीसारखे जड उद्द्योग, वीट भट्ट्यांसारखे लघु उद्द्योग, सतत चालत असलेले बांधकाम उद्द्योग, उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा, यामुळे खरं तर दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत आहे.

दरम्यान, दिल्ली सरकारनं वायू प्रदूषण वाढण्यासाठी शेतकऱ्याला जबाबदार ठरवलं होतं. मात्र दिल्ली सरकारनं केलेल्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना चांगलंच सुनावलं .

आता प्रदूषणाचा धोका लक्षात घेता केजरीवाल सरकार लाॅकडाऊन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  अशोक चव्हाण आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

 भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार का?; सौरव गांगुली म्हणतो…

 ‘दंगलीचा कट भाजपच्या ‘या’ नेत्याने रचला’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राज्यात मुसळधार पावसाचं सावट! ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘बाबासाहेब मला नेहमी म्हणायचे…’; राज ठाकरे यांची भावूक पोस्ट