मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल त्याबाबतची माहिती देण्यात आली नाही.
मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिल्यानंतरही किमान दोन महिने घरी आराम करावा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री पदभार स्वीकारण्यास सक्षम नसतील तर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कुणाला तरी निवडावं लागणार आहे.
मुख्यमंत्रीपदाचा भार कुणाकडे जाणार याबाबतची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशात काही नावं देखील समोर आली आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा भार दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.
सोशल मीडियातही तसे मेसेज व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आल्याची चर्चा होती.
सर्व चर्चांवर भाष्य करत स्वत: शिंदे यांनी आपल्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आलेली नाहीत. मुख्यमंत्री एकदोन दिवसातच रुग्णालयातून घरी येतील असं म्हटलं होतं.
तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या मेसेजवर आणि पोस्टवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील शिंदेंनी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला झटका, केली ‘ही’ मोठी घोषणा
शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना झापलं, म्हणाले…
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड; देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला
एकाच दिवशी राष्ट्रवादीला सलग दुसरा झटका; ‘या’ बड्या नेत्यानेही दिला राजीनामा
पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…