नरेंद्र मोदींकडे व्यक्त केली राष्ट्रपती व्हायची इच्छा; मोदींच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांना आलं हसू

बंगळूरू : चंद्रावर लँडीग करण्यापूर्वी ‘विक्रम लँडरशी’शी संपर्क तुटला आहे. त्यामुळे इस्त्रोमधील सर्व शास्त्रज्ञांचे चेहऱ्यावर निराशा होती. तणावात असणाऱ्या माहोलमध्ये उपस्थित असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवण्याा प्रयत्न केला.

नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमध्ये ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थित विद्यार्थांनी मोदींवर प्रश्नांचा पाऊस पाडला. मोदींनी देखील धैर्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली.

एका विद्यार्थ् दृढनिश्चयी राहण्यासाठी आम्ही काय करायला हवं?, असा प्रश्न मोदींना विचारला. लक्ष्य मोठे ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी जोडा. जे गेलं ते सोडून द्या, त्याने निराशा येते. ती नकारात्मकता सोडून द्या, असं मोदींना सांगितलं.

एका विद्यार्थाने भविष्यात भारताचा राष्ट्रपती बनायची ईच्छा असल्याचं मोदींना सांगितलं.  हे ऐकताच मोदींनी त्या विद्यार्थ्याची पाठ थोपटत शाबासकी दिली. पण राष्ट्रपती का बनायचंय? पंतप्रधान का नाही बनायचं?’ मोदी यांच्या या वक्तव्यावर उपस्थित विद्यर्थी हसायला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विद्यार्थांना स्वाक्षरी दिल्या.

दरम्यान, दिल्लीचा मनोज्ञ सिंह सुयांश, ओदिशाचा चिन्मय चौधरी, मेघालयचा रिबेत फावा याच्यासह एकूण ६० विद्यार्थी इस्रोच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत यशस्वी झाले होते. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत शनिवारी इस्रोच्या मुख्यालयात बसून चांद्रयान २ चे अवतरण बघण्याची संधी मिळाली होती.