“मुलींनी प्रेम करु नये हे समाजाने का ठरवावे… त्यांच्या भावनांचं काय??”

पुणे | व्हॅलेंटाईन दिनाचं औचित्य साधत अमरावतीच्या एका शाळेत मुलींना मी प्रेम करणार नाही किंवा प्रेमविवाह करणार नाही, अशी थपथ दिली गेली. या घटनेवर समाजातील अनेक सुजाण नागरिक व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भाष्य केलं आहे.

मुलींनी प्रेम करावं अथवा करू नये हे समाजाने का ठरवावं? असा सवाल उपस्थित करत अशाने मुलींच्या भावभावनांचे काय होणार, अशी चिंता सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मुलींना कोणत्याही चुकीच्या शपथा देण्यापेक्षा त्यांना सक्षम करण्यावर भर द्यायला हवा, असंही मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, अमरावतीच्या शाळेत दिल्या गेलेल्या शपथेवर काही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या शपथेचं समर्थन करणारा काही पालकवर्ग आहे तर अशा शपथेने मुलींच्या हक्कांवर बंधन येत असल्याचं मत काहीजण व्यक्त करत आहेत. दुसरीकडे शाळा प्रशासनाने घडलेल्या घटनेवर दिलगिरी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप नेत्याने पुष्पहार घातला म्हणून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं केलं गंगाजलाने शुद्धीकरण!

-इंदुरीकर महाराज थोडा संयम ठेवा, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत- नितीन बानुगडे पाटील

-भाजपला मोठा धक्का बसणार? या खासदाराची खासदारकी जाण्याची शक्यता

-महाराज तुम्ही खचू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत- राष्ट्रवादी आमदार किरण लहामटे

-इंदुरीकर महाराज आपण कीर्तन सोडू नका, लोकांना स्त्रियांचा आदर करायला शिकवा- चाकणकर