अर्णव गोस्वामी यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नीलाही अ.टक होणार?

मुंबई | अलिबाग पोलिसांनी काल सकाळी लवकर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना ताब्यात घेतलं आहे. इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आ.त्मह.त्याप्रकरणी कलम 306 च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णव गोस्वामींला अ.टक केलं आहे.

अर्णव यांच्या वरळी येथील राहत्या घरातून सचिन वाझे यांच्या पथकाने त्यांना अ.टक केलं आहे. गोस्वामी यांनी अन्वय नाईक यांना आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त केलं असल्याचा आ.रोप नाईक यांच्या कुटुंबियांनी केला होता. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर गु.न्हा दाखल करण्यात आला होता. अर्णव गोस्वामी यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नीलाही .अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रायगड पोलीस काल सकाळी लवकर अर्णव गोस्वामी यांना अ.टक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. यावेळी बराच वेळ पोलीस दरवाज्याबाहेर उभे असताना देखील गोस्वामी यांनी दरवाजा उघडला नाही. काही वेळाने अर्णव गोस्वामी यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर अर्णव गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने देखील पोलिसांच्या कारवाईला विरोध केला.

अर्णव गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने यावेळी पोलिसांना धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी रायगडच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. यामुळे लवकरच अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीला देखील अ.टक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडीओच्या इंटेरिअर डिझाईनचे काम केले होते. या कामाचे जवळपास नाईक यांना अर्णव गोस्वामी यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते. मात्र, वारंवार पैसे मागूनही अर्णव गोस्वामी नाईक यांचे पैसे देत नव्हते. यामुळे अन्वय नाईक प्रचंड मानसिक तणावाखाली गेले होते.

यानंतर 5 मे 2018 रोजी नाईक यांनी अलिबाग जवळील काविर गावात त्यांच्या राहत्या घरी आ.त्मह.त्या केली. नाईक यांच्यानंतर त्यांच्या आईने देखील आ.त्मह.त्या केली होती. मात्र, आ.त्मह.त्या करण्यापूर्वी नाईक यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं.

या पत्रात अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आपल्या कामाचे पैसे न दिल्यानं आपण आ.त्मह.त्या करत असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली होती.

अन्वय नाईक आ.त्मह.त्या प्रकरणी पोलीस ठाण्यात येवून जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी अनेकवेळा अर्णव गोस्वामी यांना नोटीस बजावली. मात्र, मी याप्रकरणी पोलिसांशी अजिबात बोलणार नाही, अशी भूमिका अर्णव गोस्वामी यांनी घेतली. यामुळे पोलिसांनी काल सकाळी अर्णव गोस्वामी यांच्या राहत्या घरातून त्यांना अ.टक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या वकिलांनी केला ‘त्या’ प्रायव्हेट गोष्टीचा खुलासा

‘इथे तुमचे हातवारे चालणार नाहीत’; गोस्वामींना खडसावत न्यायाधिशांनी तब्बल 10 तासाने केली सुनावणी

सुशांत प्रकरणी ‘ती’ खेळी शरद पवारांचीच?; ‘सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनविण्यासाठी बेस तयार केला जातोय’

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबई पोलिसांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

अर्णब गोस्वामी यांच्या अ.टकेनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य! म्हणाले राज्यात पत्रकारितेला…