पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार?, नारायण राणे म्हणाले…

मुंबई | पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं होतं. मोदी सरकारबद्दलचा राग पंजाबमधील नागरिकांमध्ये अद्याप कायम असल्याचं दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 20 मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले होते. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर मोदींना पंजाबमधील रॅली रद्द करावी लागली. याच मुद्द्यावरून आता देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

अशातच याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने त्यांच्या सभेच्या ठिकाणी जाणार होते, मात्र खराब वातावरणामुळे ते रस्त्याने गेले, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी यांना वाटेत अडवण्यात आलं आणि समोरून दगडफेक आणि हल्ला झाला. मी त्या घटनेचा निषेध करतो, असंही नारायण राणे म्हणाले आहेत. अशातच त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाबाबतही भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मुख्यमंत्रीपदाचा दावेदार मी असणार असं कोणी सांगितलं. मी तर असं कधी बोललेलो नाही, असं, स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं आहे.

तुम्हाला काही भविष्य माहिती असेल तर माझा हात पाहा आणि सांगा. मी असा काही विचार केलेला नाही. मी एकदा मुख्यमंत्री झालो आहे आणि आता केंद्रात मंत्री असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात नारायण राणे यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून समोर येईल, अशी चर्चा रंगली होती. त्यावर आता नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

पालकांनो लक्ष द्या! लस घेतल्यावर लहान मुलांमध्ये दिसतात ‘हे’ दुष्परिणाम

‘कपिल शर्मा शो’मधील ‘या’ कलाकाराचा आत्महत्येचा प्रयत्न, हे धक्कादायक कारण आलं समोर

झुलन गोस्वामींच्या बायोपिकचा टीझर पाहताच नेटकऱ्यांनी अनुष्काला केलं ट्रोल, म्हणाले…

पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर

कोरोनाला रोखायचं असेल तर घरातील फक्त ‘या’ पदार्थांचा करा वापर