पालकांनो लक्ष द्या! लस घेतल्यावर लहान मुलांमध्ये दिसतात ‘हे’ दुष्परिणाम

मुंबई | कोरोना (Corona) रूग्णसंख्या वाढत असल्याने आता लसीकरणावर (vaccination) भर दिला जात आहे. अशातच आता लहान मुलांचं देखील लसीकरण करण्यात येत आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लसीकरणानंतर मुलांना काही सौम्य दुष्परिणाम जाणवू शकतात. ही सौम्य लक्षणं दिसल्यानंतर घाबरून जाण्याची गरज नाही. पालकांनी हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे की, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर, तुमची मुले पूर्णपणे सुरक्षित होणार नाहीत.

ज्याप्रकारे लसीकरणाचे काही संभाव्य दुष्परिणाम 18 ते 60 आणि 60 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांमध्ये दिसले होते, तसेच ते लहान मुलांमध्ये देखील दिसू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात.

त्यामुळे जर लसीचे दुष्परिणाम दिसून येत असले तरी घाबरण्याची गरज नाही. दुष्परिणाम हे सौम्य प्रमाणात दर्शवतात, म्हणजेच की लस काम करू लागली आहे.

पहिल्या डोसच्या 4 आठवड्यांनंतर दुसरा डोस घेतला जाईल आणि 4 आठवड्यांनंतर रोगप्रतिकारक शक्ती विकसित होईल आणि त्यानंतरही संपूर्ण संरक्षण असणं मुलांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

ज्या हाताला लस घेतली आहे त्या ठिकाणी लहान मुलांना वेदना जाणवू शकतात. लसीकरणाचा लालसरपणा आणि वेदना कमी करण्यासाठी लस घेतलेल्या जागेवर थंड, मऊ कापड ठेवण्याचा सल्ला रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने दिला आहे.

लसीकरणानंतर सुमारे 15 मिनिटं बसल्यामुळे किंवा झोपल्यामुळे बेशुद्ध होण्याचे पर्याय कमी असतात. लसीकरणानंतर मुलांमध्ये सौम्य ताप देखील दिसून येतो, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

18 आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हलका ताप आल्यास गोळी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. तसेच लहान मुलांना देखील डाॅक्टरांच्या सल्यानुसार गोळी देण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या –

‘कपिल शर्मा शो’मधील ‘या’ कलाकाराचा आत्महत्येचा प्रयत्न, हे धक्कादायक कारण आलं समोर

झुलन गोस्वामींच्या बायोपिकचा टीझर पाहताच नेटकऱ्यांनी अनुष्काला केलं ट्रोल, म्हणाले…

पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर

कोरोनाला रोखायचं असेल तर घरातील फक्त ‘या’ पदार्थांचा करा वापर

पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ भागात अलर्ट जारी