एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ‘या’ बड्या नेत्यानं दिली महत्वाची माहिती म्हणाले…

कोल्हापूर | भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील इतर नेत्यांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टी.का केली होती. यामुळे एकनाथ खडसे अन्य कोणत्या पक्षात प्रवेश करणार का?, अशी चर्चा सध्या चालू आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  एकनाथ खडसे केव्हाच राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी दर्शवला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

भाजप पक्षानं एकनाथ खडसे यांना आत्तापर्यंत भरभरून दिलं आहे. ते भाजप पक्षाचे जेष्ठ आणि जुने जाणते नेते आहेत. यामुळे खडसे यांच्या कोणत्या निर्णयामुळे पक्षाचं नुक.सान होईल असं कोणतंही पाऊल ते उचलणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच एकनाथ खडसे केव्हाच पक्षांतर करणार नाहीत, असा विश्वास भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही दर्शवला आहे. व्यक्ती समजण्याची किंवा राजकारणाची मला थोडी फार समज असेल तर एकनाथ खडसे केव्हाच दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

दरम्यान, भाजप पक्षांतर्गत आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. एकनाथ खडसे यांनी ही खंत अनेकवेळा बोलूनही दाखवली होती. तसेच सुरुवातीला एकनाथ खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टी.का करत होते मात्र काही दिवसांपूर्वी खडसेंनी फडणवीसांवर थेट ह.ल्ला चढवला होता.

आम्ही पक्षाच्या बांधणीसाठी आमच्या जिवाचं रान केलं आहे. मात्र, पक्षात काल नव्यानं आलेले लोक आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. भाजपची सत्ता जाण्यासाठी ‘मी पुन्हा येईल’ ही घोषणा जबाबदार आहे का याचा अभ्यास मी सध्या करतोय, अशी टिका एकनाथ खडसे यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या काय आहे खरं कारण

अनुरागनं स्वतःच ‘त्या’ कृत्याची कबुली दिली होती; पाहा कंगणानं अनुरागला कसं उघडं पाडलं!

शिवसेनेचा लखलखता तारा निखळला! ‘या’ बड्या नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं नि.धन

‘अनुराग कश्यपनं मलाही घरी बोलावलं अन् मला म्हणाला…’; आणखी एका बड्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

दीपिका पदुकोनला अ.टक होऊ शकते का?, उज्जल निकम म्हणतात…