कंगना राजकारणात जाणार का?, ट्रोलर्सच्या या प्रश्नावर अखेर कंगनानं सोडलं मौन; म्हणाली…

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमधील क्वीन कंगना रनौत चांगलीच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना राजकारणात प्रवेश करणार का?,अशा चर्चा सुरु आहेत. कंगनानं या प्रश्नावर मौन सोडत अखेर उत्तर दिलं आहे. कंगनानं याबाबत तिच्या ‘टीम कंगना रनौत’ या ट्वीटर अकाउंट वरून माहिती दिली आहे.

ज्यांना वाटतं की मी मोदीजींच यासाठी समर्थन करते कारण मला राजकारणात जाण्याची इच्छा आहे, त्यांना मला सांगायचं आहे की माझे आजोबा कॉंग्रेसमध्ये 15 वर्षांपर्यंत आमदार होते. माझं कुटुंब राजकारणाशी जोडलं गेलं आहे. मला माझ्या गँगस्टर फिल्मनंतर दरवर्षी कॉंग्रेसकडून ऑफर येते, असं कंगना म्हणाली आहे.

मणिकर्णिका चित्रपटानंतर भाजपनेही मला ऑफर दिली होती. मी माझ्या कामावर प्रेम करते आणि कधीच मी राजकारणात जाण्याबाबत विचार करणार नाही. त्यामुळे जे लोक माझ्या आवडीच्या व्यक्तिला समर्थन करण्यासाठी मला ट्रोल करत आहेत त्यांनी आता थांबायला हवं, असंही कंगनाने म्हटलं आहे.

दरम्यान, कंगना रनौत सुरुवातीपासूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करत आहे. त्यामुळे कंगना राजकरणात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, कंगनानं ट्रोलर्सच्या या सर्व प्रश्नांवर उत्तर देत याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! चंद्रावर राहण्यासाठी वैज्ञानिकांनी बनवली मानवाच्या मूत्रापासून वीट; सविस्तर जाणून घ्या

राज्यपालांच्या ‘त्या’ मिश्किल वाक्यानंतर अजित पवारांचा राज्यपालांना दंडवत

कोथिंबिरीचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

कंगना रनौतनं उलगडलं बॉलीवूड इंडस्ट्री आणि उंडरवर्ल्ड मधील नात्याचं गूढ

अखेर उच्च न्यायालयाचा ग्रामपंचायत प्रशासकाबाबत मोठा निर्णय; राज्य सरकारला झटका!