मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेत अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला होता. आता संजय राऊत यांची पत्रकार परिषद घेत अनेक नेते आणि कार्यकर्ते देखील या परिषदेला उपस्थित असल्याचं पहायला मिळत आहे.
पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर आणि ईडीवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर कडाडून बरसले आहेत. त्यावेळी त्यांनी त्याच्या मुलावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या कुंटलीच काढली आहे.
पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर असल्याचं राऊतांनी यावेळी सांगितलं आहे.
बाप लेकांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत, त्याला कोणतीही पर्यावरणाच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत. त्यामुळे माझं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे की, किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांना अटक करावी, असंही राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, त्यांनी यावेळी देवेंद्र लधानी यांचं नाव घेत भष्ट्राचार होत असल्याचं राऊतांनी यावेळी म्हटलं आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”
“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा
“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”
‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ
निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला