भाजप-मनसे युती होणार का?; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई | आगामी निवडणुकांसाठी सध्या राजकीय वर्तुळात हालचाली पहायला मिळत आहे. येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आणि तर इतर महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होणाच्या चर्चाही जोरदार रंगल्या आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शनिवारी रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये चांगलीच फटकेबाजी केल्याचं दिसून आलं. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना भाजप मनसे युतीवर देखील भाष्य केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत परप्रांतियांच्या मुद्द्यावरून आपलं मत बदलत नाही तोपर्यंत भाजप मनसे युती शक्य नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

त्यावेळी बोलताना ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. या सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग्ज माफियांच्या धंद्यात आहेत. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यावर दबाव आणला जातोय, अशी टीका देखील दानवे यांनी यावेळी केली आहे.

निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल मिळाला होता. मात्र, दगाफटका करून हे अमर अकबर अँथनीचं सरकार आलं असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

2024 मध्ये आम्ही स्वतंत्र लढू आणि या तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, याची हमी मी देतो, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे कुटूंब राज्य सरकार्च्या दारात बसून मागण्या करत आहेत. त्यांना सवलती द्याव्यात, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

सरकारने शाळा सुरू करण्याच्या तारखा दिल्या पण दिलेल्या तारखेला शाळा मात्र सुरू झाल्या नाहीत, काय सांगायचं या सरकारचं, असंही दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, आता 98 टक्के रेल्वेसेवा सुरू झाली आहे, अशी माहिती देखील रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“तुला लईचं कळतं रं, रोहितला त्रास होईल म्हणून ऐकूण घेतोय नाहीतर…”

‘…तर तुमचं ‘कोल्हापुरी पायतान’ हातात घ्या’; राजू शेट्टी आक्रमक

“आज बाळासाहेब असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती”

…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार – कंगना राणावत

अमरावतीत कलम 144 लागू; तीन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय