“मला अजूनही लॅपटॅापवर लिहिता येत नाही, मला याचं वाईट वाटत नाही”

औरंगाबाद | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज औरंगाबादमध्ये हजेरी लावली होती. एमजीएम विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी मुक्त संवाद साधत सर्वप्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली आहेत.

या कार्यक्रमात संजय राऊत यांनी विद्यापीठातील गोष्टींना उजाळा देत, आपले अनुभवाचे कथन केलं आहे. त्यावेळी संजय राऊत यांनी पत्रकारिता क्षेत्रातील विविध विषयांवर भाष्य केलं.

एखाद्या पक्षाचं मुखपत्र सामना एवढं मोठं झालेलं मी अद्याप पाहिलं नाही. स्वातंत्र्यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरूंनी नॅशनल हेराल्ड काढलं होतं. त्यावेळी त्याला देखील मोठं स्थान होतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

स्वातंत्र्यांनतर आता शिवसेनेचं मुखपत्र सामनाला एवढं स्थान मिळालं आहे. आजही सामनाचे अग्रलेख वाचून अनेकांच्या हेडलाईन ठरतात, असंही राऊत म्हणाले.

मला अजूनही लॅपटॉपवर लिहिता येत नाही. मी अजूनही फक्त कागदावरच लिहितो. कुठेही असलो तरीही कागद आणि पेन हातात घेतल्याशिवाय मला सूचत नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.

मला याचं वाईट वाटतं नाही, जी परिस्थिती आहे ती लोकांनी देखील स्विकारली आहे. त्यामुळे आज माझ्या शब्दांना मान आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

पत्रकारांनी नेहमी लिहीत रहावं. तसेच संपादकाने देखील आपली भूमिका सात्त्याने वृत्तपत्राच्या माध्यमातून अथवा अन्य माध्यामातून मांडत रहावी, असा सल्ला देखील राऊत यांनी दिला आहे.

जो आपलं मत मांडत नाही, तो संपादक होण्याच्या लायकीचा नाही. त्याला मत असलंच पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत.

आज महाराष्ट्रातील चित्र दु:खत आहे, असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता. आज रेडिमेड फाईल मिळते आणि वाजवा म्हणून सांगितलं जात, असं म्हणत त्यांनी राज्याच्या राजकारणावर देखील टीका केली आहे.

दरम्यान, सगळ्यांना आयती बातमी दिली जाते, शोधपत्रिकेसारखी कोणती गोष्ट आता राहिली नाही, अशी खंत देखील व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप-मनसे युती होणार का?; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं… 

“तुला लईचं कळतं रं, रोहितला त्रास होईल म्हणून ऐकूण घेतोय नाहीतर…”

‘…तर तुमचं ‘कोल्हापुरी पायतान’ हातात घ्या’; राजू शेट्टी आक्रमक

“आज बाळासाहेब असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती”

…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार – कंगना राणावत