दिवंगत हरहुन्नरी कलाकार ऋषी कपूर यांना भावपुर्ण श्रद्धांजली- छगन भुजबळ

मुंबई | अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतल्या एच. एन. रूग्णालयात काल त्यांना प्रकती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं आज उपचारादरम्यान निधन झालं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विट केलं आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीला हे दु:ख पचवणं मोठं कठीण झालं आहे.

काल अभिनेता इरफान खान यांच्या दुःखद निधनानंतर आज भारतीय चित्रपट सृष्टीवर पुन्हा ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या दुःखद निधनामुळे शोककळा पसरली असून चित्रपट सृष्टीला हा मोठा धक्का असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

रसिकांचीमने जिंकली. चित्रपट सृष्टीत कपूर घराण्याचे मोठे योगदान असून ऋषी कपूर यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. दिवंगत हरहुन्नरी कलाकार ऋषी कपूर यांना भावपुर्ण श्रद्धांजली!, असं ट्विट भुजबळ यांनी केलं आहे.

दरम्यान, बॉलिवूडला गेल्या 24 तासांत सलग मोठा दुसरा धक्का बसला आहे. इरफान खान यांना जाऊन काही तास होत नाहीयेत तोपर्यंत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मरणाच्या उंबरठ्यावर असतानाही डॉक्टर, नर्सेस यांना हसवलं”

-लॉकडाऊन नंतर ‘या’ गोष्टीची मला चिंता वाटते- शरद पवार

-“शून्य संख्येनंतरच लॉकडाऊन उघडला जाईल हा विचार अशक्य”

-ऋषी कपूर यांच्या अखेरच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी उडवली होती टीकेची झोड; पाहा काय होतं ‘ते’ ट्विट

-ऋषी कपूर यांचं जाणं माझ्यासाठी अत्यंत दुख:द- अक्षय कुमार