पतीला झोपेत सेक्स करण्याचा भयंकर आजार, महिला म्हणते..

नवी दिल्ली | जगात कितीतरी लोक आहेत जे गंभीर आजारांचा सामना करत असतात आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते. एका महिलेने तिच्या पतीला असलेल्या भयंकर आजाराबद्दल माहिती दिली आहे.

या महिलेने तिचा पती सेक्सोमेनिया या दुर्मिळ आजाराने त्रस्त असल्याची माहिती दिली आहे. तिचा नवरा झोपेत असताना काय करतो हे या महिलेने एका पॅरेंटीग फोरमला सांगितलं आहे.

सेक्सोमेनिया हा एक झोपेचा किंवा पॅरासोमनियाचा एक प्रकार आहे. या भयंकर आजारामुळे एखादी व्यक्ती झोपेत असताना शारीरक संबंध ठेवण्यासाठी भाग पडते.

या महिलेचा पती गेल्या 10 वर्षांपासून या आजाराने त्रस्त असल्यांचं सांगितलं आहे. झोपेतून उठल्यावर कित्येकदातरी मी अवघडलेल्या स्थितीत आढळून आल्याचा खुलासा या महिलेने केला आहे.

मी माझ्या जोडीदाराला 10 वर्षांपासून ओळखते. पण या सर्व गोष्टींचा माझ्यावर वाईट परिणाम होतो. हा अनुभव शब्दात व्यक्त करणं खुप अवघड असल्याचंही या महिलेने सांगितलं आहे.

रोज रात्री माझ्या नवऱ्याला हा त्रास होतो असं नाही. मात्र, जेव्हा त्याला या भयंकर आजाराचा त्रास होतो या सगळ्यानंतर मला वापरलेले आणि असुरक्षित वाटते, असा अनुभव संबंधित महिलेने सांगितला आहे.

माझ्या नवऱ्याने झोपेत असे कृत्य करताना मी त्याला एक दोन वेळेस उठवलं आहे. त्याच्या जवळ येण्याचा थोडा आवाज झाला की माझे डोळे उघडतात, असंही ती महिला म्हणाली.

दरम्यान, या महिलेने तिचा अनुभव सांगितल्यानंतर पॅरेंटिग फोरमच्या यूजर्सने तिला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! खाण्या-पिण्याची आणि झोपण्याचीही डिग्री देते ‘ही’ युनिवर्सिटी, वाचा सविस्तर

पुण्यात तिसरी लाट येणार?; कोरोनाच्या रुग्णसंख्येत ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टरचा अपघात कसा झाला?; ‘हे’ महत्त्वाचं कारण आलं समोर

Omicron ला रोखण्यासाठी ‘हे’ औषध प्रभावशाली; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

मोठी बातमी! एसटी संप मागे घेत नसल्यानं एसटी महामंडळानं उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल