‘या’ बड्या अभिनेत्री देखील लग्नाआधी होत्या गर्भवती, नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने नुकतंच काही दिवसांपूर्वी अभिनेता वैभव रेखी यांच्यासोबत सात फेरे घेत आपल्या वैवाहिक जिवनाची सुरुवात केली आहे. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली असतानाच दियाने ती प्रेग्नेंट असल्याची माहिती सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली आहे.

लग्नानंतर अवघ्या काही दिवसंताच दियाने गुड न्यूज दिल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. प्रेग्नेंट असल्यानेच दियाने लग्न केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र, लग्नाआधी प्रेग्नेंट असणाऱ्यांमध्ये दिया एकटीच नाही. आज आपण जाणून घेऊयात अशाच काही अभिनेत्रींविषयी.

1. श्रीदेवी
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्या काळात अतिशय घाईघाईत अगोदरपासूनच विवाहीत असणाऱ्या बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. लग्न करण्याआधी त्यांनी बोनी कपूर यांना त्या अगोदरच गर्भवती असल्याचं सांगितलं होतं. लग्नाच्या वेळी त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या.

2. नेहा धुपिया
अभिनेत्री नेहा धुपियाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. नेहा आणि अंगद बेदी यांनी खूप वर्षांच्या रिलेशनशीपनंतर 2018 मध्ये लग्न केलं होतं. यानंतर काही दिवसांनीच नेहाने ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. नेहा आणि अंगदने एका कार्यक्रमात नेहा लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याचं मान्य केलं होतं.

3. कल्की कोचलीन
अभिनेत्री कल्की कोचलीन ही निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची पहिली बायको आहे. सध्या कल्की क्लासिकल पियोनिस्ट गायक हर्शबर्ग याच्यासोबत लिव्ह- इन रिलेशनमध्ये आहे. या दोघांनी अजून लग्न केलेले नाही. मात्र या दोघांना सध्या एक मुलगी आहे.

4. नताशा स्टेनकोविक
नुकतंच गेल्या वर्षी नताशा स्टेनकोविक हिने क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत लग्न केलं आहे. कोरोनामुळे या दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केलं होतं. लग्नानंतर या दोघांनी सोशल मीडियावरुन आपल्या लग्नाबद्दल चाहत्यांना खूशखबर दिली होती. याचवेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना नताशा गरोदर असल्याचं देखील सांगितलं होतं.

5. नीना गुप्ता
जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या ख्यातनाम क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनमध्ये होत्या. विवीयन यांनी आपल्या पहिल्या बायकोसोबत घटस्फोट घेण्यास नकार दिला होता. यामुळे या दोघांनी लग्न केलं नाही.

मात्र, नीना गुप्ता या लग्नाआधीच गरोदर राहिल्या होत्या. विवीयन यांच्यापासून नीना यांना एक मुलगी झाली. या मुलीला नीना गुप्ता यांनी एकटीनेच वाढवले.

महत्वाच्या बातम्या-

भाऊ कदम कसे करतात स्क्रिप्टचे पाठांतर?, पाहा व्हिडीओ

देसी जुगाड वापरत ‘या’ काकांनी ब्लेडशिवाय केली…

सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला राखी सावंतने सुनावले असे…

‘ए जानू चल झाडू मार’; शिल्पा आणि राजचा हा…

श्रद्धा कपूरच्या घरात अचानक शिरला गोलिरा अन…;, पाहा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy