‘या’ पाच बड्या अभिनेत्री होत्या अक्षयच्या गर्लफ्रेंड, एकीसोबत तर दोनवेळा केला होता साखरपुडा

मुंबई | अभिनेता अक्षय कुमार हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक खूप मोठं नाव आहे. अक्षय कुमारने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. अक्षय आपल्या व्यवसायिक आयुष्यबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे देखील नेहमी चर्चेत असतो.

अक्षयने अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न केलं आहे. मात्र, लग्न करण्याआधी त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध होते. अक्षयच्या या प्रेमसंबंधांच्या चर्चा आज देखील रंगत असतात. अक्षय एक नाही दोन नाही तर तब्बल आठ अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

अक्षय कुमार एकाचवेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाला डेट करत होता. यावेळी त्याच्या रिलेशनशिपच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. मात्र, धडकन चित्रपटानंतर शिल्पा आणि अक्षयचा काही कारणांमुळे ब्रेकअप झाला.

‘खिलाडीयो का खिलाडी’ या चित्रपटानंतर अभिनेत्री रेखा आणि अक्षय कुमारच्या नात्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या होत्या. या नात्याविषयी जेव्हा लोकांना समजल त्यावेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

रेखा यांच्यानंतर अक्षय कुमार अभिनेत्री रविना टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील चालू होत्या. रविना आणि अक्षयने दोनवेळा साखरपुडा केला होता. मात्र, अक्षयबरोबर होणारी भांडणं आणि त्याची अन्य अफेअर्स यामुळे रविनाने ब्रेकअप केला.

तसेच अभिनेत्री कतरीना कैफसोबत देखील अक्षयचं अनेकदा नाव जोडलं गेलं. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्याकाळात माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट केलं होत.

कॅटनंतर अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या रेलेशनशीपच्या देखील चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या दोघांनी केव्हाच आपल्या नात्याची कबूली दिली नाही. परंतु बऱ्याचदा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

‘मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…’; सैफ अली खानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

‘पती पत्नी और वो’ नवऱ्याला बायकोनं पकडलं रंगे हात, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘इंडियन आयडॉल 12’ मधील सर्वांची लाडकी जोडी KBC मध्ये लावणार हजेरी, व्हिडीओ व्हायरल

…अन् सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत अनेकदा रडला, पाहा व्हिडीओ

परफेक्ट सीनसाठी ‘या’ अभिनेत्रीने सर्वांसमोर न्यूड होऊन अभिनय केला होता