‘मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…’; सैफ अली खानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

मुंबई | अभिनेता सैफ अली खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सैफला त्याच्या चित्रपटांमुळे अनेकवेळा ट्रोल व्हावं लागलं आहे. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सतत करण्यात येतो. सैफसोबत त्याच्या कुटुंबाला देखील धार्मिक गोष्टींवरून ट्रोल करण्यात येतं.

काही महिन्यांपूर्वीच सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर हिने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. या मुलाच्या नावावरून देखील सैफ आणि करीनाला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी करीनाने ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं होतं.

सैफ लवकरच ‘भूत पोलीस’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच त्याचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. या पोस्टरवरूनच आता सैफला ट्रोल करण्यात येत आहे. ट्रोलर्सला उत्तर देताना सैफने आपण नास्तिक असल्याचं सांगत काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

याविषयी बोलताना सैफ म्हणाला की, खऱ्या आयुष्यात मी एक नास्तिक माणूस आहे. याबाबतीत मी धर्मनिरपेक्ष आहे. धर्मासारख्या गोष्टींमुळे नंतरच्या जिवनावर प्रभाव पडत असल्यानं माझी चिंता वाढते.

तसेच धर्मामुळे माझा देव, तुझा देव, कोणाचा देव योग्य, कोणाचा देव अयोग्य अशा समस्या उद्भवू लागतात. यामुळे मी फक्त प्रार्थना करतो आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत असतो, असं देखील सैफ यावेळी म्हणाला आहे.

पुढे पुनर्जन्माविषयी बोलताना सैफ म्हणाला की, तुमचा एकदा मृत्यू झाला की सर्वकाही संपतं, ही गोष्टी खूप दुःखद आहे. त्यानंतर मग काहीही होऊ शकत नाही. सैफने यावेळी धर्माच्या नियमांचा त्याच्यावर काहीच प्रभाव पडत नसल्याचं देखील सांगितलं आहे.

दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी सैफचा भूत पोलीस हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर पाहून दर्शकांना चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘पती पत्नी और वो’ नवऱ्याला बायकोनं पकडलं रंगे हात, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘इंडियन आयडॉल 12’ मधील सर्वांची लाडकी जोडी KBC मध्ये लावणार हजेरी, व्हिडीओ व्हायरल

…अन् सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत अनेकदा रडला, पाहा व्हिडीओ

परफेक्ट सीनसाठी ‘या’ अभिनेत्रीने सर्वांसमोर न्यूड होऊन अभिनय केला होता

काय सांगता! भारतीने घटवलं तब्बल 15 किलो वजन, बदल पाहून चाहते आवाक्