‘शरद पवार आहेत म्हणून…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राज्यातील महाविकास आघाडीबाबत भाष्य केलं. ज्यामुळे शरद पवार यांच्याकडेच महाविकास आघाडीचं रिमोट असल्याचं स्पष्ट झालं आहे.

शरद पवार आहेत म्हणून महाविकास आघाडी सरकार जोरात सुरू आहे, असं बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Woman) 29 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी राज्यातील महिला धोरण आणि महिला सुरक्षितता अशा विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.

महीला धोरणांची अंमलबजावणी झाली पाहीजे. रस्त्यावर प्रत्येक 25 किमी वर टॉयलेट हवेत, हे कर्नाटक मध्ये आहे तर आपल्या इथे का नाही असंही त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, महीला धोरणांना आपण महत्व देत नाहीत, त्यांना महत्व दिलं पाहीजे. कोस्टल रोड झाली नाही तरी चालेल पण मुलांसाठी, महीलांसाठी पैसे दिले पाहीजे यासाठी मी भांडते, असं त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सरकार चालवताना चढाओढ सुरु असल्याचे बोललं जातं. मात्र चर्चा कितीही झाल्या तरी शरद पवार यांच्यासारख्या नेत्यामुळेच महाविकास विकास आघाडीचे सरकार राज्यात ताकदीने काम करत असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

मोबाईल नंबर Block केल्याचा आला राग, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं 

आज 73 वा प्रजासत्ताक दिन, संपूर्ण राष्ट्र साजर करतं सणासारखा उत्सव 

राष्ट्रवादीने फोडला काँग्रेसचा गड! तब्बल 27 नगरसेवकांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

राहुलची कर्णधार म्हणून काराकिर्द संपुष्टात?, बीसीसीआय अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य

‘लेडी सेहवाग’चा जलवा बरकरार! पुन्हा जागतिक क्रमवारीत गाठलं अव्वल स्थान