युवराज सिंग झाला बाबा, घरी छोट्या ‘युवराज’चं आगमन

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) घरी पाळणा हलला आहे. पत्नी हेजल कीच (Hazel Keech) आणि युवराज सिंह आई-वडील झाले असून त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे.

ही माहिती युवराज सिंगने ट्विटरवर दिलीय. मुलगा झाल्याने आनंद गगनात मावत नसल्याची प्रतिक्रिया युवराजने दिली आहे.

सर्व फॅन्स, कुटुंबीय आणि मित्रांना सांगायला आनंद होत आहे की, आम्हाला आज देवानं मुलाचा आशीर्वाद दिला आहे. आम्ही देवाचे यासाठी आभार मानतो. आमच्या खासगीपणाचा तुम्ही आदर कराल अशी आशा आहे. या जगात लहान बाळाचं स्वागत आहे. लव्ह, हेजल आणि युवराज, असं ट्विट युवराजने केलं आहे.

भारतीय क्रिकेट (Cricket) संघाचा भाग असताना युवराज सिंहने अनेक पराक्रम केलेले आहेत. सहा चेंडूमध्ये सहा षटकार लगावणारा खेळाडू म्हणूनदेखील युवराजची ओळख आहे.

दरम्यान, 30 नोव्हेंबर 2016 रोजी युवराज सिंहने लग्न केलं होतं. युवराजची पत्नी हेजल कीचने आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीने केलेली आहे. तर सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटात हेजलने अभिनेत्री म्हणून काम केलेले आहे.

या चित्रपटात हेजलने करिना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. हेजलने आतापर्यंत मॅक्सिम, धर्मसंकट, बाँके आणि बाँके की क्रेझी बारात या चित्रपटात काम केलेलं आहे.

हेजलने हिंदी तसेच पंजाबी आणि तेलुगू चित्रपटातदेखील काम केलेलं आहे. हेजलने बीग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये भाग घेतला होता.

भारताच्या दिग्गज ऑल राऊंडरमध्ये असलेल्या युवराजने 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने 40 टेस्ट 304 वन-डे, 58 टी20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. 2007 साली झालेला टी20 वर्ल्ड कप आणि 2011 साली झालेला वन-डे वर्ल्ड कप जिंकण्यात युवराजची भूमिका मोठी होती.

महत्वाच्या बातम्या- 

‘शरद पवार आहेत म्हणून…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मोबाईल नंबर Block केल्याचा आला राग, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं 

आज 73 वा प्रजासत्ताक दिन, संपूर्ण राष्ट्र साजर करतं सणासारखा उत्सव 

राष्ट्रवादीने फोडला काँग्रेसचा गड! तब्बल 27 नगरसेवकांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

राहुलची कर्णधार म्हणून काराकिर्द संपुष्टात?, बीसीसीआय अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य