‘तुम्ही तुमच्या रक्ताचे नमुने ड्रग टेस्टसाठी द्या’; बॉलिवूडच्या या बड्या कलाकारांना कंगणाने केलं आवाहन

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या मृ.त्यूनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यावेळी बॉलिवूडची क्वीन कंगणा राणावतने सुशांतच्या आत्मह.त्येला थेट बॉलिवूडला जबाबदार धरलं होतं. सुशांतच्या प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. हा तपास चालू असतानाच कंगणाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधील जे कलाकार ड्र.ग्जचं  घेतात त्यांची नाव जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.

कंगणा राणावतला इंडस्ट्रीतील मोठ्या व्याक्तिचे ब्लड टेस्ट हवे आहेत ते सुद्धा कोणत्याही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड होण्याअगोदर आणि ही योग्य मागणी आहे. कारण ड्र.ग अडीक्ट असेलेले कलाकार आपले आदर्श असू शकत नाहीत, असं अश्वानी महाजन यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी कंगणाला टॅग केलं होतं. दरम्यान या ट्विटला उत्तर देत कंगणाने कलाकारांची नाव घेतली आहेत.

माझी विनंती आहे  की, रणवीर सिंह, रणवीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशिक यांनी आपल्या रक्ताचे नमुने ड्रग टेस्टसाठी द्यावेत. कारण अशा अफवा आहेत हे कलाकार कोकोन या अमली पदार्थाचे अॅडीक्ट आहेत. त्यामुळे त्यांनी या अफवांना खोट्या ठरवण्यासाठी तुम्ही ब्लड टेस्ट करा. तुमच्या क्लिन टेस्टने तुम्ही देशताील करोडो तरूणांना प्रेरित करताल, असं कंगणाने म्हटलं आहे.

कंगणाने एकप्रकारे नाव न घेता रणवीर सिंह, रणवीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशिक या कलाकारांवर आरोप केला आहे. कंगणाने जेव्हा मुलाखतीत सांगितलं की इंडस्ट्रीतील 99 टक्के कलाकार ड्र,ग्जचं घेतात यावर इंडस्ट्रीतील कोणताही कलाकार समोर आला नाही आणि कंगणाला विचारलं नाही की, कंगणा तु कोणत्या आधारावर हे आरोप करत आहेत.

कंगणाने केलेल्या ट्विटमुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. कारण ज्यांची नाव घेतली आहेत हे सर्व कलाकार इंंडस्ट्रीतील मोठे कलाकार आहेत. त्यामुळे आता कंगणाने नाव घेतलेल्या कलाकारांपैकी कोणता अभिनेता आपली काय प्रतिक्रिया देतो हा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान,  कंगणाने केलेल्या ट्विटमुळे आपल्याला चंदेरी दुनियेची  काळी बाजू समोर येणार असल्याची शक्यता आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील टीव्ही9 चे पत्रकार पांडुरंग रायकर याचं निधन

येणारे 3 महिने धोक्याचे, राज्य सरकारने खबरदारी म्हणून घेतला मोठा निर्णय

एनसीबीची मोठी कारवाई; अखेर सुशांत प्रकरणातील पहिला आरोपी गजाआड

…म्हणून रियाच्या भावाला कधीही होऊ शकते अटक?; सुशांतच्या प्रकरणात अखेर रियाच्या भावाचं नाव आलं समोर!

किरीट सोमय्या यांनी फक्त भो भो न करता आरोप सिद्ध करून दाखवावेत- किशोरी पेडणेकर