1 मार्चपासून तुम्हालाही मिळेल कोरोनावरील लस, जाणून घ्या कशी आहे नोंदणीची प्रक्रिया?

मुंबई | देशात कोरोना महामा.रीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरण दिलं जात आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. देशभरात 16 जानेवारीपासून सुरु झालेलं कोरोना लसीकरण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत येऊन पोहोचलं आहे.

शेवटी सर्वसामान्यांची कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा संपली आहे. आता त्यांनाही कोरोना लसीकरण दिलं जाणार आहे. देशात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

यानुसार 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. मात्र 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना कोरोनावरील लस घेण्यासाठी त्यांच्या आजाराचं सर्टीफिकेट द्यावं लागणार आहे.

यासाठी देशभरातील 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जाईल. सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत असेल. मात्र, खासगी केंद्रावर काही शुल्क घेऊन लस दिली जाईल.

ही लस सरसकट दिली जाणार नाही. तुम्हाला लस घेण्यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. 1 मार्चपासून नागरिकांना को-वीन हा अॅप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांसाठी ऑफलाईन नोंदणीची प्रक्रिया चालू आहे.

1 मार्चपासून तुम्ही को-वीन किंवा आरोग्य सेतू या अॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी करु शकता. cowin.gov.in या संकेतस्थळावरुन देखील तुम्हाला लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल.

तसेच जर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या सेवा केंद्रावर जावून देखील नोंदणी प्रक्रिया करु शकता. याचप्रमाणे तुम्हाला नोंदणी करण्यासाठी एक टोल फ्री नंबर देखील देण्यात आला आहे. 1507 या नंबरवर कॉल करुन तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करु शकता.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना वि.षाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यांत कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणं हे दिलासा देणारं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहरांत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

पहिली ते नववीच्या परिक्षा रद्द होणर? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या…

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार परिक्षा

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी

जाणून घ्या! गाजर खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

शहनाज गीलसोबतच्या लग्नाबाबत सिद्धार्थ शुक्लाचा मोठा खुलासा; म्हणाला….