सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजची अवस्था पाहून तुम्हाला देखील अश्रू अनावर होतील, पाहा फोटो

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सिद्धार्थच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांसह चाहत्यांचा लाडका सिद्धार्थ आता या जगात नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास लोक तयार नाहीत.

या बातमीनंतर सिद्धार्थची मैत्रिण अभिनेत्री शहनाज गीलची अवस्था खूप वाईट झाली आहे. तिला सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख सहन होत नाहीए. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर प्रथमच शहनाजचे काही फोटोज समोर आले आहेत. हे फोटो पाहून तुमच्या देखील डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.

पोस्टमॉर्टमनंतर सिद्धार्थचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले. सिद्धार्थच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मोठे सेलेब्रिटीज घरी पोहोचले होते. ओशिवरा स्मशानभूमीत सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ओशिवरा स्मशानभूमीमध्ये देखील अनेक कलाकार सिद्धार्थच्या अंत्यदर्शनासाठी आले आहेत. अभिनेत्री शहनाज गील देखील स्मशानभूमीत सिद्धार्थच्या अंत्यदर्शनासाठी आली आहे. यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी शहनाजचे काही फोटोज खेचले आहेत.

यावेळी शहनाजची अवस्था पाहून सर्वांनाच अश्रू अनावर झाले. सिद्धार्थच्या मृत्यूपासून शहनाजचे अश्रू थांबत नाहीत. पोलिस बंदोबस्तामध्ये शहनाज स्मशानभूमीत दाखल झाली. कारमध्ये देखील तिला कसलीही शुद्ध नव्हती. तिच्या अखंड अश्रूधारा चालूच होत्या.

दरम्यान, शहनाज आणि सिद्धार्थ दोघे बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते. बिग बॉस मधील शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री सर्वांनाच खूप आवडली. शोदरम्यान या दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाले, मतभेद झाले, तरी देखील हे दोघे नेहमी एकमेकांच्या जवळ राहिले. त्यामुळे ही जोडी सर्वांची फेवरेट राहिली.

या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी सिदनाज असं नाव दिलं होतं. या दोघांचं बॉन्डिंग केव्हा केव्हा प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात अश्रू आणणारं ठरलं. मात्र, आता ही सिदनाजची जोडी आपल्याला केव्हाच एकत्र पाहायला मिळणर नाही.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ बड्या अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता सिद्धार्थ शुक्ला

‘या’ सीनमुळे नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला स्लट शेमिंगला सामोर जावं लागलं

पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

‘सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकत नाही’, सिद्धार्थच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती, जाणून घ्या काय आहे मृत्यूच कारण