‘या’ बड्या अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता सिद्धार्थ शुक्ला

मुंबई | ‘बिग बॉस 13’चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. सिद्धार्थने अचानक एक्झिट घेतल्यानं त्याच्या चाहत्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठिण होते. त्याने अगदी कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपलं मोठं नाव तयार केलं होतं.

सिद्धार्थ आजपर्यंत अनेक मुलींबरोबर रिलेशनशीपमध्ये राहिला आहे. त्याच्या प्रेमाविषयी नेहमीच माध्यमांमध्ये काही न काही चर्चा चालू असायच्या. आज आपण जाणून घेऊयात सिद्धार्थच्या या रिलेशनशीप्सबद्दल.

सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शहनाज गील हे दोघेजण बीग बॉसमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर ते डान्स दिवाणे मध्ये देखाील एकत्र पाहायला मिळाले होते. दोघांची शोदरम्यान चांगलीच मस्ती पाहायला मिळाली. यावेळी सिद्धार्थ आणि शहनाज हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात होतं.

तसेच बीग बॉसनंतर सिद्धार्थ आणि आकांक्षा पुरी एकमेकांना डेट करत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. अभिनेता आणि मॉडेल पारस छाब्राने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, या दोघांचं नातं फारकाळ टिकू शकलं नाही.

अभिनेत्री शेफाली जरीवाल देखील करिअरच्या सुरुवातीला सिद्धार्थला डेट करत होती. याबद्दल शेफालीने स्वत: खुलासा केला होता. परंतु या दोघांनी काही काळातच आपलं नातं थांबवलं.

अभिनेत्री दृष्टी धामी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक खूप मोठी अभिनेत्री आहे. दृष्टी देखील सिद्धार्थसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या दोघांचं नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही. दृष्टीने आता नीरज खेमासोबत लग्न केलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अगदी कमी वेळात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सिद्धार्थने एक अभिनेता म्हणून खूप नाव कमवलंच आहे परंतु त्याबरोबरंच त्याने एक उत्तम माणूस म्हणून देखील अनेकांच्या ह्रद्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ सीनमुळे नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला स्लट शेमिंगला सामोर जावं लागलं

पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

‘सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकत नाही’, सिद्धार्थच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती, जाणून घ्या काय आहे मृत्यूच कारण

अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज होणार अंत्यसंस्कार