‘फुट पाडणारी तुमची भाषा अन् वक्तव्य’; देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका

मुंबई| राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केलेल्या भाषणावरून टीका केली होती.

शरद पवार म्हणाले होते की, आज देशाची सुत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपुर्वी भोपाळ येेथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

मला आश्चर्य वाटत की, तिथं कुठेही आदिवासी शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी हा शब्द वापरला. वनवासी हा शब्द आदीवासींना मंजूर नाही, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली आहे.

त्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आदिवासी समाजात फुट पाडणारी तुमची भाषा आणि वक्तव्य आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनजाती’ असा उल्लेख केला आहे.

पंतप्रधान बोलत आहेत की,  देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 10 टक्के असूनही अनेक दशकांपासून जनजाती समाजाला त्यांची संस्कृती, त्यांचे सामर्थ, पुर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले. आदिवासींचे दु:ख त्यांची तखलीब, लहान मुलांच शिक्षण, आदीवासींचे आरोग्य याबद्दल या लोकांना काही फरक पडला नाही.

भारताच्या संस्कृतीमध्ये जनजातीय समाजाचे योगदान अतुट राहिलेले आहे. तुम्हीचं सांगा? जनजातीय समाजाच्या योगदानाशिवाय काय प्रभु राम चंद्रांच्या जीवनात सफलतेची कल्पना केली जाऊ शकते का, बिलकूल नाही, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, तुमच्या सारख्या मोठ्या नेत्यांना तथ्ये आणि नेमकी माहिती असालया हवी, असं म्हणतं शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

तुम्ही दावा केल्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी शब्द वापरले नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

तुम्ही ज्या लोकांसोबत व्यासपीठावर आहात, त्यांची पार्श्वभूमी तुम्ही तपासायला हवी होती. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत, हेही तुम्ही तपासायला हवं होतं, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“अरे कुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर आलं, त्यातही राजकारण करायला लाज वाटली नाही का?”

“शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय, त्यांना वाटायचं भाजप…”

 ‘दुसरा गाल पुढं करणं हे भीतीचं लक्षण नाही तर…’; कंगनाला मिळालं जोरदार प्रत्युत्तर

“आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला, आता आम्हीही उतरावं का?”

 “नियती माफ करणार नाही, प्रत्येक सेकंदाची किंमत भाजपला चुकवावी लागेल”