युजवेंद्र चहलला पहिली विकेट मिळताच पत्नि धनश्रीला अश्रू अनावर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई| इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या पर्वातील 10 वा सामना अनेक प्रकारे विशेष ठरलाय. 10 वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाली. या मॅचमध्ये आरसीबीनं केकेआरचा 38 रननं पराभव केला. हा आरसीबीचा सलग तिसरा विजय असून यामुळे त्यांनी पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

या मोसमातील तीन सामन्यांनंतर युजवेंद्र चहलनं जेव्हा पहिली विकेट घेतली तेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या धनश्रीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील बॉलरला या हंगामात पहिली विकेट काढण्यात यश मिळाल्यानं आनंदानं कर्णधार विराट कोहलीनं मिठी मारली. तर पत्नीला अश्रू अनावर झाले आणि स्टेडियममध्ये रडू कोसळलं. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत. पत्नी भावूक झाल्यानं तिचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

चहलला पहिली विकेट घेण्यासाठी या आयपीएल मोसमात तीन सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली. सुरुवातीला दोन सामन्यात त्याला यश मिळालं नाही. मात्र कोलकातासोबत झालेल्या सामन्यात चहलनं धमाकेदार बॉलिंग केली.

युजवेंद्रने चार षटकांत 32 धावा देत दोन विकेट्स घेतले होते. ज्याक्षणी युजवेंद्रने पहिला विकेट घेतला त्याक्षणी धनश्री भावुक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं.

सोशल मीडियावर धनश्रीचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर निरनिराळ्या कमेंट दिल्या आहेत. त्यांनी धनश्रीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्यांच्या प्रेमाला खऱ्या प्रेमाची उपमा दिली आहे. काही युझर्सनी तिला चहलला पाठिंबा देणारी जोडीदार म्हटलं आहे.

चहलनं पहिली विकेट घेताच इमोशनल झालेल्या धनश्रीचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला. त्यावेळी धनश्रीच्या डोळ्यात अश्रू आले होते. चहलनं नितिश राणाला आऊट करत या आयपीएलमधील पहिली विकेट घेतली. राणानं त्यापूर्वी चहलला दोन सलग फोर लगावले होते. त्यानंतर तो देवदत्त पडिक्कलकडं कॅच देऊन आऊट झाला. चहलनं पुढच्याच ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकला एलबीडब्ल्यू आऊट केलं.

दरम्यान, धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली पहायला मिळते. ती आपले नवनवीन फोटो आणि डान्स व्हिडीओ सोशल मीडियवर शेअर करत असते.

 

महत्वाच्या बातम्या – 

‘मास्क मुक्ती’ देणारा जगातील पहिला देश!…

कोरोना काळात ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल तर जाणून घ्या…

जाणून घ्या! कोरोना लसीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करा…

‘सलमान खान आमच्यासाठी देवदूतच!’ ‘या’…

कोरोना लस घेण्यासाठी महिला पोहचली चक्क नवरीच्या वेशभूषेत,…