शाईनिंग करत लाकडी पूलावरून सायकल चालवायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही इतके मजेशीर असतात, की त्यांना पाहिल्यानंतर डोळ्यातून पाणी येत इतपत हसवणारे असतात.

आपल्याला माहित आहे की, हल्ली दुचाकी गाडीही कोणीही चालवू शकते. आतातर 4,5 वीच्या इयत्तेत शिकत असलेलाही मुलगा गाडी चालवत असतो. परंतू काहींना तर तेही येत नाही. एवढचं नाहीतर काही लोकांना साधी दोनचाकी सायकलही येत नाही.

सायकल चालवणं जरी सोप असलं तरी, ती चालवत असतातना तोल सांभाळणे हे खूप महत्वाचे असते. अशातच याच संदर्भताील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण लाकडी फळीवर सायकल चालवत आहे. तोल गेल्यानं खाली असलेल्या पाण्यामधेय पडतो.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरूण नदीवर असलेल्या एका लाकडी पूलावरून सायकल चालवत आहे. परंतू तो पूल रूंदीला खूप बारिक असल्याचं दिसून येतं आहे. तो तरूण नदीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत सायकलीवरून जाण्याचा प्रयत्न करीत आहे.

सुरूवातीचा काही वेळ तो तरूण अंतर पार करतो. परंतू दुसऱ्या टोकाला पोहचायला काही अंतरच राहिलं असल्यावर अचानक त्या तरूणाचा तोल जातो आणि तो त्या लाकडी फळीच्या पूलावरून खाली असलेल्या नदीच्या पाण्यात पडतो. त्याला पडलेला पाहून, व्हिडीओ काढत असलेले त्याचे मित्र त्याच्यावर जोर-जोरात हसत असल्याचंही व्हिडीओमधून समजतं आहे.

हा व्हिडीओ ‘होल्ड माय बिअर’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ 36 हजार लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या तरूणावर मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

https://twitter.com/HldMyBeer/status/1427295765160943623?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1427295765160943623%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fman-collapsed-in-water-during-cycle-stunt-funny-video-goes-viral-mhkp-593553.html

महत्वाच्या बातम्या-

‘या’ अभिनेत्रीच्या मोहक रूपानं चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

धाडस करत चक्क तरूणीने पकडला भला मोठा साप; होतयं सोशल मीडियावर कौतुक, पाहा व्हिडीओ

भर लग्न मंडपात तरूणीने नवरदेवाला चांगलाच बदडला, पाहा व्हायरल व्हिडीओ

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! स्वत:चं लग्न सोडून चक्क नवरी गेली बर्गर खायला,पाहा व्हिडीओ