‘कोणीतरी आम्हाला वाचवा!’; अमेरिकन सैन्यापुढे अफगाणी महिलेचा आक्रोश, पाहा व्हिडीओ

काबूल | सध्या जगभर चर्चा आहे ती फक्त अफगाणिस्तान या देशाची. देशातील बहुतांश भाग तालिबानच्या सैन्याने काबीज केला आहे. यामुळे देशात सर्वत्र भीतीचं वातावरण तयार झालं आहे. देशातील नागरिक देश सोडून बाहेर जावू लागले आहेत.

रविवारी दुपारच्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाली. देशाची राजधानी असणाऱ्या काबूलवर तालिबानी सैन्याने ताबा मिळवताच देश सोडून जाण्यासाठी नागरिकांनी विमानतळावर मोठी गर्दी केली. मात्र, या विमानतळावरुन विमान वाहतूक बंद करण्यात आली.

विमान वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर विमानतळावरील काही महिलांनी अमेरिकन सैन्याकडे धाव घेतली. यावेळी या महिलांनी अमेरिकन सैन्यापुढे आम्हाला वाचवा म्हणून आक्रोश केला. तालिबानी येत आहेत, कोणीतरी आम्हाला वाचवा, अशी विनंती यावेळी अफगाणी महिलांनी अमेरिकन सैन्यापुढे केली.

सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अफगाणी नागरिक अमेरिकन सैन्यापुढे आक्रोश करताना दिसत आहेत. फर्नाझ फसिही यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अफगाणी लोकांचं दु:ख स्पष्टपणे जाणवत आहे. व्हिडीओतील महिलेचा आक्रोश सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यामध्ये देखील तालिबानच्या परिस्थितीवरुन चर्चा पार पडली आहे. अफगाणी लोकांना मदत करण्याचे आश्वासन या दोन्ही नेत्यांनी दिले आहे. यावर चर्चा करण्यासाठी जी 7 देशांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.

जी ७ देशांमध्ये कॅनडा, फ्रान्स, जपान, इटली, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन या देशांचा समावेश आहे. या 7 देशांच्या होणाऱ्या बैठकीत अफगाणिस्तान मधील घडामोडींवर संयुक्त धोरण ठरविण्यात येणार आहे. जगभरातील अनेक बडे नेते अमेरिकेला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ अभिनेत्रीच्या मोहक रूपानं चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

धाडस करत चक्क तरूणीने पकडला भला मोठा साप; होतयं सोशल मीडियावर कौतुक, पाहा व्हिडीओ

भर लग्न मंडपात तरूणीने नवरदेवाला चांगलाच बदडला, पाहा व्हायरल व्हिडीओ

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! स्वत:चं लग्न सोडून चक्क नवरी गेली बर्गर खायला,पाहा व्हिडीओ