ठाकरे सरकरामधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण; शरद पवारांच्या बैठकील होते हजर

सातारा | कोरोनाच्या अतिसंक्रमणामुळे देश हादरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढत चालला असून बरे होण्याचं प्रमाण 70.4 % इतकं आहे. मात्र काही नामवंत दिग्गज व्यक्तीना कोरोनाची लागण झाली यातील काहींना आपल जीवही गमवावा लागला आहे. अशातच ठाकरे सरकारमधील सातारचे पालकमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची कोरोनाची प्राथमिक लक्षण जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली मात्र यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आहे. महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थितीत होते. सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार गेले होते तेव्हा पाटीलही उपस्थित होते.

बाळासाहेबांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना लगेचच कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या संपर्कात ते आले होते.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात 364 कोरोनाग्रस्त मृत्यू झालाअसून 12,608 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. सध्याचा मृत्यू दर 3.39% इतका असून 1,51,555 रुग्णांवर उपचार चालू आहेत.

महत्वाच्या बातम्या-

स्वातंत्र्यदिनाला लागलं गालबोट! पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ, साताऱ्यातील खळबळजनत घटना

धक्कादायक! रक्षाबंधननंतर काही दिवसातच भावाने ज्याप्रकारे बहिणीचा खून केला ते ऐकून तुम्हीही व्हालं थक्क

“जे दिसतात ते सोबत नसतात, जे असतात दे दिसत नाहीत”

‘मेड इन इंडिया’ कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत कधी पोहोचणार?; नरेंद्र मोदी म्हणाले…

पुण्यातील पवार-फडणवीसांचा ‘हा’ योगायोग महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा तर नाही ना?