भारतरत्न लतादीदींनी राम मंदिराचं श्रेय दिलं ‘या’ दोन महत्वाच्या नेत्यांना!

मुंबई | आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आज मोठ्या थाटामाटात पार पडला. आज देशाच्या कोनाकोपऱ्यात सर्व लोकांनी जल्लोष केला. आजचा  दिवस हा ऐतिहासक म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे. अशातच भारतरत्न,, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी मंदिरा होण्याचं श्रेय राजकारणातील दोन मुख्य नेत्यांना दिलं आहे.

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. लतादीदींनी मंदिराचं श्रेय भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना दिलं आहे.

अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे, असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.

जेव्हा कारसेवकांनी बाबरी पाडली होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलले होते की, जर ती मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे.

महत्वाच्या बातम्या-

अयोध्येत राम मंदिराचं काम सुरु; आता पाकिस्तानात सुरु झाली कृष्ण मंदिर बांधण्याची मागणी

सुनेला भूतबाधा झाल्याच्या संशयावरून सासरच्या माणसांनी तिच्यासोबत केलं असं काही की…

रक्षाबंधन दिवशी बहिणींनी ओवाळले अन् भावाने ओवाळणीत दिले आपले प्राण

माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांबद्दल पोलिसानेच काढले अपशब्द अन् मग…

अमृताजी, पोलीस बांधव तेच आहेत बदललीय ती फक्त तुमची दृष्टी; चाकणकरांचा निशाणा