…म्हणून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंंत्री उद्धव टाकरेंना केला फोन; म्हणाले…

मुंबई | राज्यात इतके दिवस दडी मारलेल्या पावसाने अचानक मुसंडी मारली आहे. गेले दोन दिवस मुंबईत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने जनजीनव विस्कळीत झालं आहे. दरम्यान याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला असल्याची माहिती समजली आहे.

केंद्र सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलं आहे. यासंदर्भातील माहिती ट्विट पीएमओ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

मुंबईला सलग दोन दिवस पावसाने झोडपलं आहे. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुंबईकरांना केलं आहे.

दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. मुंबईतील या स्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारीक लक्ष ठेवून आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

भारतरत्न लतादीदींनी राम मंदिराचं श्रेय दिलं ‘या’ दोन महत्वाच्या नेत्यांना!

अयोध्येत राम मंदिराचं काम सुरु; आता पाकिस्तानात सुरु झाली कृष्ण मंदिर बांधण्याची मागणी

सुनेला भूतबाधा झाल्याच्या संशयावरून सासरच्या माणसांनी तिच्यासोबत केलं असं काही की…

रक्षाबंधन दिवशी बहिणींनी ओवाळले अन् भावाने ओवाळणीत दिले आपले प्राण

माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांबद्दल पोलिसानेच काढले अपशब्द अन् मग…