चीनकडून युद्धाचे संकेत; सीमेलगत अण्वस्त्रवाहू विमाने, फायटर विमाने तसेच हजारो सैन्य तैनात

नवी दिल्ली | गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशातील तणाव वाढतच आहे. राजकीय तसेच लष्करी पातळीवर अनेकवेळा हा तणाव कमी करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, आता भारताच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्यांच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील चीनकडील भागात सैन्य आणि युद्ध साहित्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली आहे. लष्करी हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘डिट्रेस्फा’ने उपग्रहांद्वारे काही छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांमध्ये चीनने बॉम्बर विमाने तैनात केल्याचं स्पष्ट दिसत आहे.

त्याबरोबरच चीनने अनेक अण्वस्त्रवाहू विमाने, सहा हजार किलोमीटर पर्यंत मारा करणारी फायटर विमाने आणि हजारो चीनी सैन्यही सीमेवर तैनात केलं आहे. सीमेवर तैनात केलेल्या विमानांपैकी दोन विमानांवर क्षेपणास्त्रही लावण्यात आलेली आहेत.

चीनने भारत सीमेलगत आठ हवाईतळ उभारले आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून ठिकठिकाणी युद्धसराव होत आहेत. भारतीय संरक्षण तज्ञांच्या मते हा केवळ सराव नसून युद्धाची तयारी आहे.

महत्वाच्या बातम्या-

आत्महत्येपूर्वी सुशांत सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी; मुंबई पोलिसांचा नवा खुलासा

खुशखबर! आता घरीच करू शकाल कोरोनाची चाचणी अखेर भारताने बनवलं स्वस्तातलं टेस्टिंग किट!

नव्वदीपार केलेल्या महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानी केली कोरोनावर मात

“सुशांत सिंहच्या खात्यातून गेल्या 90 दिवसात रियाने तब्बल इतके कोटी केले खर्च”

“अमित भाई, लवकरात लवकर बरे होऊन कोरोनाच्या या काळात आम्हाला मार्गदर्शन करावं”