बारामती | चहा हा शरीराला घातक असतो आणि चहावाला देशाला घातक असतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता केली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आले. यावेळी बारामती शहरातून अजित पवार त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तेव्हा त्यांच्या सत्कार समारंभाच्या भाषणात मिटकरी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांचा नेम चुकला. बारामतीत डिपॉझिट जप्त करू असं फडणवीस म्हणाले होते. मात्र नागपूरमध्ये त्यांना जिल्हा परिषद राखता आली नाही. त्यामुळे उतू नका, मातू नका कारण गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस आहे, असं म्हणत मिटकरी यांनी फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले.
मागच्या सरकारने जातीचे राजकारण केलं होतं. काटेवाडीतील लोकांनीही फडणवीसांचे ऐकलं नाही. फडणवीसांचा सत्तेचा माज बारामतीकरांनी उतरवला, अशी टीकाही मिटकरी यांनी केली.
दरम्यान, जर बोलण्यातून लोक निवडून आले असते, तर मनसेचे 20 ते 25 लोक निवडले असते, असं म्हणत मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य- अजित पवार – https://t.co/USOKvcS7re @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो, हे मराठवाड्याच्या मातीनं दाखवून दिलं- शरद पवार – https://t.co/RW2Dq2Fl41 @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
180 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या पोलिसांना घरं देणार- अजित पवार – https://t.co/DpZWYO8L2J @AjitPawarSpeaks @NCPspeaks @MumbaiPolice
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020