बारामती | देवेंद्र फडणवीस यांचा नेम चुकला. बारामतीत डिपॉझिट जप्त करू असं फडणवीस म्हणाले होते. मात्र नागपूरमध्ये त्यांना जिल्हा परिषद राखता आली नाही. त्यामुळे उतू नका, मातू नका कारण गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीसांचा सत्तेचा माज बारामतीकरांनी उतरवला, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी भव्य नागरी सत्काराचं आयोजन केलं होतं. यावेळी अमोल मिटकरी बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उतरती कळा लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा नेम चुकला. मागच्या सरकारने जातीचे राजकारण केलं होतं. काठेवाडीतील लोकांनीही फडणवीसांचं ऐकलं नाही, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चहा हा शरीराला घातक असतो आणि चहावाला देशाला घातक असतो, असा टोलाही मिटकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
महत्वाच्या बातम्या-
चहा शरीराला तर चहावाला देशाला घातक; राष्ट्रवादीच्या नेत्याची पंतप्रधानांवर टीका – https://t.co/CidLStZOB8 @amolmitkari22 @narendramodi @BJP4Maharashtra @BJP4India @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 11, 2020
राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य- अजित पवार – https://t.co/USOKvcS7re @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो, हे मराठवाड्याच्या मातीनं दाखवून दिलं- शरद पवार – https://t.co/RW2Dq2Fl41 @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020