वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांच्यावर एमआयएमची मोठी कारवाई

मुंबई |  गुलबर्ग्यातल्या CAA विरोधी मोर्चात आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केलं होतं. यावरुन राजकीय वातावरण तापलं असून वारिस पठाण यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याचप्रकरणी एमआयएमने वारीस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे. जोपर्यंत पक्षाकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.

या वक्तव्यावर, मी माफी मागणार नाही. मी जे काही बोललोय ते संविधानाच्या मर्यादेतच राहुन बोललोय, असं म्हणत वारीस पठाण यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. जे लोक संविधानाच्या विरोधात आहेत ते कायद्याच्या विरोधात आहे. भाजप आम्हाला 130 कोटी लोकांपासून वेगळं करण्याचा घाट घालत आहे, असा आरोपही पठाण यांनी केला आहे.

दुसरीकडे गुरूवारी बंगलोरमध्ये असदुद्दीन ओवैसी भाषण करण्यासाठी उभे असताना एका तरुणीनं व्यासपीठावर येऊन ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा प्रकार घडला. यावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, “आम्ही या घटनांचं समर्थन करत नाही. आमचा जोपर्यंत जीवात जीव असेल तोपर्यंत आम्ही भारत जिंदाबाद… भारत जिंदाबाद… भारत जिंदाबाद… ह्याच घोषणा देऊ”

महत्त्वाच्या बातम्या-

-भारतात 1 कोटी लोक माझं स्वागत करणार- डोनाल्ड ट्रम्प

-ओवैंसींच्या सभेत गोंधळ; तरूणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा!

-“इतकी लपवा-छपवी लहान मुलंही करत नाहीत, जितकी मोदी सरकार करत आहे”

-तलवारीचं उत्तर तलवारीने देऊ; मनसेचा वारीस पठाण यांना इशारा

-एकत्र राहण्याच्या काळात असं बोलाल तर 15 कोटीच राहाल- जावेद अख्तर