मुंबई | राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार वाद रंगला आहे. विविध मुद्द्यांवरून नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेत्यांनी अनेकदा सरकार अस्थिर होण्याचा धोका असल्याची वक्तव्य केली आहेत.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीतील आमदारांबाबत दानवेंचं एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे.
महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत, निवडणूक येऊ द्या एक-एक आमदार भाजपच्या वाघोरीत येतील, असं दानवे म्हणाले आहेत.
रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीतील ते 25 आमदार कोण?, अशी चर्चा रंगली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई, राज्यपालांचा हस्तक्षेप, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवावरून राज्यात अगोदरच राजकारण तापलेलं आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकार गृहखात्याच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत असल्याची तक्रार केली होती.
दरम्यान, फडणवीसांच्या तक्रारीनंतर राज्य सरकारनं उत्तर दिलं होतं. गृहखात्याचा मुद्दा मागं पडत नाही की लगेचच दानवेंच्या वक्तव्यानं वादाला पुन्हा सुरूवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट
‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा
जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!
कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट, म्हणाले…
‘कॉपी करताना सापडल्यास…’; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय